Balasaheb Thackeray Birth Anniversary LIVE : बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधीमंडळात थोड्याच वेळात अनावरण

Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे.जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jan 2023 07:02 PM

पार्श्वभूमी

Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray) यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले...More

Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण सोहळा; अनेक मान्यवर उपस्थित

विधीमंडळात थोड्याच वेळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.