Bacchu Kadu vs Radhakrishna Vikhe : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आमरण उपोषणाला बसले होते. सात दिवसानंतर बच्चू कडू यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बच्चू कडू यांचे उपोषण हे प्रसिद्धीसाठी आहे. बच्चू कडूंना विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य असेल, अशा शब्दात टीका केली होती. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला प्रहारचे प्रवक्ते ॲड मनोज टेकाडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Continues below advertisement


ॲड. मनोज टेकाडे यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, हे विखे पाटील नाही तर हे विकले गेलेले पाटील आहेत. शेतकरी जो पोशिंदा आहे, त्याच्याबद्दल हे असे बोलतात. अहो, उपोषण करणं सोपं आहे तर तुमच्या मुलाला सात दिवस उपोषणाला बसवा. ते पण निवडणुकीत पडले आहेत. बच्चू कडू प्रसिद्धीसाठी आंदोलन करतात आणि उपोषण करतात असे म्हणणारे तुम्ही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 


सत्तेसाठी इतकी चाटूगिरी करू नये


ते म्हणाले की, जर शेतकऱ्याने उस पिकवला नाही तर तुमचा उसाचा कारखाना उभा राहिला असता का? विचारा तुमच्या आजोबांना किंवा वडिलांना. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सहकारधुरीण पुस्तकात लिहिले आहे की, शेतकऱ्यांनी उसाचा कारखाना उभा करायला दागिने आणि पैसा दिला होता, त्यावर तुमचं आज वैभव उभं आहे. शेतकऱ्यांनी तुम्हाला उभं केलं आहे. त्या शेतकऱ्याबाबत तुम्ही असे बोलत आहात. उपोषण इतकंच सोपं आहे तर मग आपल्या मुलाला उपोषणाला बसवा. सत्तेच्या बाजूने माणसाने इतकेही जाऊ नये की, आपले अस्तित्व देखील विसरून जावे. सहकारधुरीण हे पुस्तक तुम्ही वाचा. तुम्ही स्वतः सेना, काँग्रेस, भाजप, असे फिरत राहिले. इतकी चाटुगिरी माणसाने करू नये. किमान शेतकऱ्याच्या बाजूने तरी उभेत राहावे, असेही मनोज टेकाडे यांनी म्हटले. 



इतर महत्त्वाची बातमी


Indrayani Kundmala bridge collapse: आम्हाला तिकडे लावलेली पाटी दिसली असती तर.... कुंडमळा दुर्घटनेतील जखमींनी नेमकं काय सांगितलं?


नाकाने कांदे सोलणारे, तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार