Ashok Chavan Live : आता व्यक्तिगत टीका करणार नाही, वेळ आल्यावर बोलेन - अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने आम्हाला कोणताही फरक पडणार नाही...काँग्रेस तसा मोठा सागर आहे, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही असं विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हंटले आहे...एक जण गेला तर दुसरा येईल असंही ते म्हणाले सोबतच राज्यसभेच्या जागेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, एका सदस्यावर राज्यसभा अवलंबून नसते, मोठा ग्रुप असता तर फरक पडला असता...अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने जालन्यात थोडाफार फटका बसू शकतो, उर्वरीत मराठवाड्यात कोणताही फरक पडणार नाही असंही दानवे म्हणाले.
आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. जे नेते योग्य वाटतात त्यांच्याशी आमची चर्चा आहे. हे खरं आहे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा रोल काय असेल याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Ashok Chavan BJP : काँग्रेसला त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली हे कळत नाही. देशातील मुख्य धारेत जायला पाहिजे असे मुख्य नेत्याना वाटते म्हणून नेते आमच्याकडे येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटले. मी पक्षासाठी योगदान दिले. मी पार्टी वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे टीका करणे योग्य नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
आम्ही विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. विकासाची आम्ही नेहमी साथ दिली. 38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय.
विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करून. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांना दिलेली. पंतप्रधान मोदी सबका साथ सबका विकास करत आहेत. मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही.
सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिकपणे केले. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी संबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही.
Ashok Chavan BJP : अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे त्याचा आम्ही फायदा घेऊयात. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan BJP) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलताना अडखळल्याचं दिसून आलं. सवयीप्रमाणे अशोक चव्हाण यांनी अनावधानाने काँग्रेस असा उल्लेख केला.
अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा उल्लेख केला. त्यानंतर आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजप अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हटलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.
मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिक पणे केली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी सबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करीन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन, असे अशोक चव्हाण म्हणाले.
मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक राहिले, आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, असे अशोक चव्हाण म्हणाले.
विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलीकडे सबंध होते. विकासाची राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतोय, असे अशोक चव्हाण म्हणाले.
आज भाजपमध्ये माझी पहिलीच पत्रकार परिषद होतेय. थोडासा गोंधळ समजून घ्या, असे अशोक चव्हाण म्हणाले. पक्षप्रवेशावेळी आशिष शेलार यांचा भाजप मुंबई अध्यक्ष म्हणण्याऐवजी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
मोदीजींनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळेच देशातील अनेक नेत्यांना आज मोदीजींसारख्या मजबूत नेतृत्त्वासोबत यावसं वाटतंय, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातलं एक जेष्ठ नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करत आहे. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक गाजवली. विविध मंत्रीपद भूषवली, दोनवेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षसदस्यावर सही घेऊन प्रवेश दिला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.
अशोक चव्हाण आपल्या कार्यालयातून भाजप कार्यालयात पक्ष प्रवेशासाठी निघाले आहेत. थोड्याच वेळात होणार पक्ष प्रवेश
भाजपात प्रवेश करताना मला उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिळावा असा अशोक चव्हाण यांचा प्रस्ताव होता. मात्र या प्रस्तावाला भाजपच्या मोठया नेत्याने विरोध केला. त्यामुळे अशोक चव्हाण यांना राज्यसभा आणि एक विधानसभा देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची सुत्रांची माहिती. राज्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांच नेहमीच वजन राहिलेला आहे. त्यामुळे राजाच्या राजकारणात सहभागी होण्यासाठी अशोक चव्हाण यांचा प्रयत्न होता. मात्र भाजपच्या मोठ्या नेत्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना राज्यसभा देण्यात आल्याची सूत्रांची माहिती
काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा निर्धार एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय करेल. मी काँग्रेसमध्येच राहील असा माझा निर्णय पक्का असल्याचे आमदार विकास ठाकरे म्हणाले.
अशोक चव्हाण यांच्याशी दोन दिवसापूर्वीच संपर्क झाला होता.. मात्र ते पक्ष सोडून जात आहेत, असा कुठलाही संकेत त्यांनी दिलेला नव्हता. पक्ष सोडल्यानंतर ही अशोक चव्हाण यांनी माझ्याशी किंवा इतर कुठल्याही आमदाराशी संपर्क साधलेला नाही अशी माहिती ही विकास ठाकरे यांनी दिली.
अशोक चव्हाण यांनी भविष्यात संपर्क साधला तरी मी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही असा दावाही ठाकरेंनी केला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षात कुठलेही प्रयत्न केले जात नव्हते, प्रदेश काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल अशोक चव्हाण यांनी लोकमतच्या मुलाखतीत जो आरोप केला आहे, त्या संदर्भात मी भाष्य करू शकत नाही, मी तेवढ्या वरिष्ठ पातळीवर काम करणारा नेता नसल्याचे सांगून विकास ठाकरे यांनी तो प्रश्न टाळला..
आज राजकीय आयुष्याची पुन्हा सुरुवात करणार आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. 12.30 वाजता फडणवीस, बावनकुळे, अशिष शेलार य़ांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. मी कोणाला निमंत्रित केलेल नाही. मी कुठल्याही आमदाराला बोलावलं नाही , अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
आज मी नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. मी कोणत्याही आमदार किंवा नेत्याला काही बोललो नाही. मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल.
आगामी राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.
पक्षांतरबंदी कायद्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये सध्या तरी प्रवेश येणार नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये क्राॅस वोटिंग करण्यासाठी भाजपचं मेगा प्लानिंग सुरु
अनेक आमदारांनी अशोक चव्हाण यांना समर्थन दाखवल आहे. मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे लगेच अशोक चव्हाण यांच्या सोबत जाणं आमदारांना शक्य नाही
राज्यसभेच्या एका उमेदवाराला 40.9 चा कोठा ठरलेला आहे तो काँग्रेस पूर्ण करते
मात्र गुप्त मतदान असल्याने कांग्रेसचे काही आमदार क्राॅस वोटींग करण्यासाठीचा मोठा प्लान सुरु करत आहे
महायुती सहापैकी पाच जागा जिंकत आहे मात्र एक जागा कांग्रेसला जाताना पाहायला मिळत आहे
क्राॅस वोटींगमुळे सहावी जागा ही महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक समर्थक आमदार आणि नेत्यांचा अशोक चव्हाण यांना फोन केल्याचं समोर आलेय.
तुम्ही घेतलेल्या भूमिकेला आमचं समर्थन असल्याचं अशोक चव्हाण यांना सांगण्यात आलं
मात्र आताच काँग्रेसची साथ सोडता येणार नाही कारण पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ शकतो
त्यामुळे सध्या तरी अशोक चव्हाण यांच्यासोबत अमर अंतापुरकर यांच्यासह इतर कोणी प्रवेश करणार नाही
मात्र येत्या काळामध्ये अनेक जण भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असल्याची सुत्रांची माहिती
अशोक चव्हाण यांनी राजीनामा देताच दिल्लीतील हायकमांड अलर्ट,राज्यातील काँग्रेसच्या आमदारासोबत तातडीनं संपर्क करण्याच्या सूचना,
पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम यांच्याकडून काँग्रेसच्या आमदारांना फोन, आज मुंबईत राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांची बैठक,
माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजीत कदम हे आजच्या बैठकीला उपस्थितीत राहणार,मुंबईत १४ फेब्रुवारी रोजी होणार सर्व काँग्रेस आमदारांची बैठक
Congress reaction on Ashok Chavan : 14 फेब्रुवारीला काँग्रेस विधीमंडळाची तातडीची बैठक, सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावले. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदारांची भूमिका पक्षाकडून जाणून घेण्यात येणार
अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून राजीनामा मंजूर, विधीमंडळाकडून अधिसूचना जारी
Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं.
Ashok chavan resignation news : कोणताही पक्ष असो धुसफूस तर असतेच, मात्र त्यासाठी नेते आपली आयडियोलॉजी सोडून जात नाही. दिल्लीचे नेतृत्व या सर्वकडे लक्ष ठेऊन आहे, त्यांची बारीक नजर आहे.. येणाऱ्या दिवसात तुम्हाला परिणाम पाहायला मिळेल. राज्याच्या नेतृत्वावर नाराज आहे की दबावाला बळी पडून जात आहे, असे नितीन राऊत म्हणाले.
Ashok chavan resignation news : काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करु. राजीनामा देण्याचं काहीही कारण नाही. मला कुणाची उणीदुणी काढायची नाहीत, असे अशोक चव्हाण म्हणाले.
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण यांच्या राजीनामा वरती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेससाठी दुर्दैव गोष्ट, भारदस्त नेता होते. पण ही भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
Ashok chavan BJP news : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेचीही गणिती बदलणार आहेत. भाजप राज्यसभेला चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडून मतांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू आहे.
चौथा उमेदवार देत भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू आहे.
Ashok Chavan : माजी आमदार अमर राजूरकर (Amar Rajurkar) यांनीदेखील पक्ष सदस्यस्त्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजूरकर यांनीदेखील राजीनामा दिला,
Ashok chavan BJP news : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस मधील मोठ्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.
काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची घेतली भेट
अशोक चव्हाण यांच्या राजीनामाच्या संदर्भात चर्चा केली चर्चा
अशोक चव्हाण यांच्यासोबत किती समर्थक आमदार जाऊ शकतात यासंदर्भात चर्चा केल्याची सूत्रांची माहिती
Ashok chavan BJP news : भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू असल्याचे समजतेय. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणी सुरू आहेत. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी आहे.
Ashok chavan resignation news : दोन वेळा मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीनं पक्ष सोडणं हे पक्षाकरता चांगलं नाही. पक्षानं अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. दिल्ली नेतृत्वानं विचार करणं आवश्यक आहे. इतर आमदारांच्या मनात चलबिचल आहे. मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे. ही बाब केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आली होती. त्यावर योग्य वेळी काम करायला हवं होतं, असे भाई जगताप म्हणाले.
मी नाना पटोले यांच्या कार्यशैलीमूळे काँग्रेस पक्ष सोडला आता अशोक चव्हाणांनी तोच निर्णय घेतला, असे म्हणत आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांना लक्ष केले.
Ashok chavan resignation news : मागच्या आठवड्यातच अशोक चव्हाण यांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट
अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता
आपला पक्ष प्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत व्हावा असे त्यांनी या भेटीत सांगितल्याची सूत्रांची माहिती
अमित शहा 15 तारीखला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत याच दरम्यान अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याची शक्यता
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला का नाही हे माहीत नाही मात्र काँग्रेसच्या राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.. कुणा एका व्यक्तीच्या पक्षातून जाण्यान त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. अशोक चव्हाण एकटे गेले का? त्यांच्यासोबत किती आमदार आहेत याची माहिती नाही. मात्र जर भाजप म्हणत असेल की आम्ही यावेळी 400 पार आहोत तर मग तुम्हाला दुसऱ्या पक्षाचे नेत्याची गरज का पडते, असे अंबादास दानवे म्हणाले.
Ashok chavan resignation news : मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही,अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेस मधील आणखी मोठे नेते भाजप च्या संपर्कात आहेत.कॉंग्रेसमध्ये अस्वास्थ्यत आहे.
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार कोणते ?
नसीम खान, माजी आमदार, चांदिवली
चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार, चेंबूर
राजू पारवे, आमदार, उमरेड
विकास ठाकरे, आमदार, पश्चिम नागपूर
मोहन हंबर्डे,नांदेड दक्षिण
जितेश अंतापूरकर, देगलूर (नांदेड)
सुभाष धोटे, राजुरा, चंद्रपूर
अमित झनक, रिसोड, वाशिम
अशोक चव्हाण यांना राज्य
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काही आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. याशिवाय, मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्ष सोडू शकतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण हे काल काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांची देहबोली फारशी चांगली दिसत नव्हती. परवा त्यांनी काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील बैठकीला दांडी मारली होती. गेले दोन दिवस अशोक चव्हाण हे दिल्लीत होते. याठिकाणी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. आज भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल, त्यामध्ये चव्हाणांचे नाव असू शकते.
Ashok chavan resignation news : भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या!
महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. 'आगे आगे देखिए होता है क्या' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंकजा नेत्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांचं अंडरस्टँडिंग पक्कं आहे. त्यांच्या भाषणातील एक-दोन वाक्ये काढून मीडिया दाखवतो. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहील, असं फडणवीसांनी सांगितलं. बिहारमध्ये नेमकं काय चाललंय याची मला माहिती नाही. मी आधी भाजपचा प्रभारी होतो, आता नाही. अलिकडच्या काळात उद्धवजी जे बोलतायत, ते फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. कालच मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, गेट वेल सून.
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण सोबत चार आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं समजतेय. यामध्ये मराठवाड्यातील काही नेत्यांचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितलं.
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मंत्रीपद देण्यासाठी भाजप नेत्यांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे त्यांना राज्यसभा दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
Ashok chavan resignation news : नसीम खान, चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस नेतेही भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती. नाना पटोले यांच्यावरील नाराजीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय.
Ashok chavan resignation news : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने दिल्लीला जाणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या संदर्भात सुरू असलेल्या घडामोडी संदर्भात दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचं समजतेय. नाना पटोले रायपुरहून दिल्लीला जाणार आहेत.
Ashok chavan resignation news : आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी अशोक चव्हाण पुढच्या तासाभरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं. पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण आमदारकी सोडणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. दोन्ही राजीनाम्यानंतर चव्हाण भाजपात प्रवेश करणार आहेत.
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी तीन नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लवकरच अशोक चव्हाण यांच्यासोबत या तीन नेत्यांचाही प्रवेश होण्याची शक्यता - सूत्र
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी बातमी आहे. ते विधानभवनात राजीनामा देण्यासाठी गेल्याची माहिती आहे, पण अधिकृत माहिती नाही. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेलं, तिथे अस्वस्थ राहण्याचं कारण नाही. ते भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं मी स्वागत करतो, असं भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. भाजपला कोणाचीही गरज नाही, पण ज्यांना गरज आहे, ते भाजपमध्ये येतात असंही चिखलीकरांनी सांगितलं.
अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर आजूबाजूच्या लोकसभांवर प्रभाव पडेल असं म्हटलं जातं, यावर चिखलीकर म्हणाले, फार काही फरक पडेल असं नाही. तिन्ही मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे खासदार आहेत. अशोक चव्हाणांना हरवून मी खासदार झालो आहे, त्यामुळे काही विशेष फरक पडणार नाही. पण थोडी बळकटी येईल, असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.
लातूरची, हिंगोलीच, धाराशिवची जागा महायुतीने जिंकली आहे. त्यांच्या येण्याने भाजपला बळकटी येईल, त्यांनी अनेक वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे, अशी सावध प्रतिक्रिया प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.
Ashok chavan resignation news : अजून दुजोरा मिळाला नाही, पण गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सातत्याने सुरु आहे. अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सातत्याने सुरु होती. पण अशोक चव्हाण यांनी त्याचे खंडन केले होते. पण आज सकाळपासून मी त्यांना फोन करत आहे. पण त्यांचे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांचे फोन बंद आहेत. पण अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील काँग्रेसचे एक-दोन आमदार असतील, अशी शक्यता आहे, अशी शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केली.
Ashok chavan BJP news : अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.
Ashok chavan resignation news : अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या स्वीय सहायाकांचाही फोन नॉट रिचेबल आहे. 14 फेब्रुवारी रोजी काँग्रेसमधील मराठवाड्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजले होते. नांदेड, धाराशिव, पश्चीम महाराष्ट्रातील मोठे काँग्रेस नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं समोर आलेय.
Ashok chavan BJP news : भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश आज झाला नाही, तर उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनिल देशमुख यांनी अशोक चव्हाण महाविकास आघाडीला सोडणार नाहीत याची मला खात्री आहे. ही अफ़वा आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.
Ashok chavan resignation news : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सुत्रांनी सांगितलेय. मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहे, त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
मुंबई भाजपमध्ये काँग्रेसच्या नेत्याची पक्षप्रवेशाची मोठी तयारी सुरु आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील आणखी काही नेत्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. नांदेडमधील काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे मोठे मासे गळाला लागतील, असे वक्तव्य केले होते.
पार्श्वभूमी
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. आज त्यांचा अधिकृत भाजपमध्ये प्रवेश झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -