Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil, Antarwali Sarati : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यात उद्यापासून (दि.6) शांतता रॅलेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या रॅलेपूर्वी राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदिपान भूमरे यांनी आज (दि.5) अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे आणि दोन्ही खासदारांमध्ये कोणती चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  


सरपंचाच्या घरी तिघांची चर्चा 


मनोज जरांगे यांची उद्यापासून  शांतता रॅली सुरू होणार आहे. त्या आधीच सरकारच्या हालचाली वाढल्या असल्याचे चित्र आहे.  येत्या सोमवारी म्हणजे आठ तारखेला शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. चार दिवसांचा हा दौरा असणार आहे.  त्यात मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत शिंदे समिती पुरावे गोळा करणार आहे. एकूण आठ जण या दौऱ्यावर जाणार आहेत. मराठा कुणबी,  कुणबी मराठा या नोंदी ऐतिहासिक पुरावे हे सगळं हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जमा करण्यासाठी शिंदे समितीची हा दौरा असणार आहे.  या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे. 


288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे याचा निर्णय 13 तारखेनंतर घेऊ


मराठा आरक्षणातील (Maratha Reservation) सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर  राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं, शिंदे साहेबांनी  शब्द दिला आहे असं शंभुराज देसाई म्हणाले होते. दरम्यान, आता 13 जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटलांनी आज (दि.5) जालना येथील पत्रकार परिषदेत सरकारला अल्टिमेटमची आठवण करुन दिली आहे. 


मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं : मनोज जरांगे


मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं मुलींचे अॅडमिशन सुरू झालेले आहेत. अॅडमिशन झालेल्या मुलींचे पैसे परत करायला लावा, अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


विधानसभेसाठी रणनीती आणि विधान परिषदेसाठी मतांची जुळवा जुळव,'मविआ'च्या बैठकीत काय काय ठरलं?