नवी दिल्ली:  देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis)  एका वक्तव्यावरुन संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपला (BJP)  चांगलंच घेरलंय. पुण्यातल्या भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली होती.  विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election)  विरोधकांचे 20  आमदार आमच्याकडे आल्याचा दावा फडणवीसांनी केला होता... त्यावरुन राऊत चांगलेच आक्रमक झाले. देवेंद्र फडणवीसांना अटक करुन त्यांची चौकशी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जशास तसं उत्तर द्या असं सांगताना फडणवीसांनी ठोकून काढण्याची भाषा केली होती. त्यालाही राऊतांनी उत्तर दिले आहे, राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, असे राऊतांनी आव्हान केले आहे. ते दिल्लीत  माध्यमांशी बोलत होते.  


संजय राऊत म्हणाले,  ईडी सीबीआयला वापरून आम्ही दबाव आणत नाही. देवेंद्र फडणवीस गुंडांची भाषा करत आहेत.   महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा हे फडणवीस बोलत आहेत. फडणवीसांचा नागपूरमध्ये पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन फडणवीसांनी भाषा करावी.  ठोकशाही काय आहे हे जनता दाखवेल.  ईडी सीबीआय पोलिस बाजूला ठेवून या मग तुम्हाला कळेल महाराष्ट्र काय आहे?


अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटते : संजय राऊत


देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल  केलाय. पुण्यातील भाजप प्रदेश कार्यकारिणी अधिवेशनात अमित शाहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.  त्या टीकेला आज संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.  संजय राऊत म्हणाले,   देशाचे गृहमंत्री कसे नसावे याचं उदाहरण अमित शाह आहेत. कधीकाळी तडीपार का झाले आणि कोणत्या गुन्हात तडीपार झाले हे अमित शाहांना पाहावे. अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटते. 
गृहमंत्र्याची भाषा कशी असायला पाहिजे.  


नवाज शरीफचा केक कापून खाण्यात कधीच रस नव्हता, राऊतांचाा शाहांवर पलटवार


शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर घाणेरडे वक्तव्य करून निघून जातात.  मराठी समाजाबद्दलचा हा द्वेष आहे. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण आज अमित शाहांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हे अमित शाहांना माहित नाही का? मोदी आणि शाह यांच्या भांडण झालेलं दिसतंय.ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख आहेत असे म्हणतात. आम्ही जिना फॅन्स क्लब नाही किंवा नवाज शरीफचा केक कापून खाण्यात कधीच रस नव्हता. या देशात मुस्लिमांनी सुद्धा बलिदान केलंय. महाराष्ट्राचा पराभव भाजपला जिव्हारी लागला आहे.  राज्यातील जनतेनं अमित शाहांचा पराभव केला. तुम्हाला महाराष्ट्र लुटू देणार नाही हे संदेश अमित शाहांना राज्यातील जनतेनं दिलाय.




 


हे ही वाचा :


Sanjay Raut: ज्यांच्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे आता भाजपसोबत, मोदी-शाहांचं भांडण झालंय: संजय राऊत