पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र (NCP Merger) याव्यात, अशी मनोमन इच्छा होती. त्यासाठी ते प्रयत्नही करीत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मी, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील; तसेच विठ्ठल मणियार यांनी बोलावे आणि त्यांना राजी करावे, असेही त्यांच्याकडून दोन वेळा सांगण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे. त्यानंतर आज एबीपी माझाशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात कोणत्या बैठका झाल्या होत्या का? नेमकं काय घडलं होत, त्याबाबत अंकुश काकडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(NCP Merger)

Continues below advertisement

या सगळ्या बाबत बोलायला आता वेळ नाही

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती? अजित पवार- शरद पवारांची आधीच चर्चा झालेली? याबाबतच्या प्रश्नावर बोलताना काकडे म्हणाले, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली होती की नाही याबाबत कोणाला माहिती नाही. मला देखील याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झाली होती. विठ्ठल मणियार आणि मी आम्हाला दोघांनाही अजित पवारांनी एकत्र येण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आम्हालाही आनंद होता. अजित पवारांची धुरा कोणी सांभाळावी याबाबत आता बोलणे योग्य नाही कारण अजित पवारांचे कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय झाला असता पण त्याआधीच अजित पवार गेले. अजित पवारांच्या हयातील हा निर्णय झाला असता तर बरं झालं असतं, पण आता ते गेल्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे तसे आमचे सगळ्यांचेच इच्छा आहे. अर्थमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार या सगळ्या बाबत बोलायला आता वेळ नाही. तशी परिस्थिती ही नाही, असंही काकडेंनी म्हटलं आहे.(NCP Merger)

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट 

सुनेत्रा पवार यांची बारामतीमधे भेट घेतल्यानंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा भेट घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. अजित पवारांकडे असलेली खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षांतर्गत घडामोडींबाबत कदाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दुपारनंतर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे पक्ष एकत्रित करण्याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार  असल्याची माहिती आहे.(NCP Merger)

Continues below advertisement

दोन्ही पक्ष एक करण्याबाबत आज किंवा उद्या पवार कुटुंबिय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चेत केवळ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे, स्वत शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी होते. अजित पवार नसल्यामुळे आता पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती? अजित पवार- शरद पवारांची आधीच चर्चा झालेली?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन विलीनीकरणाचे घोषणा ही 8 फेब्रुवारी रोजी होणार होती अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझा मिळाली आहे. अपघातापूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांची चर्चा झाली होती अशी माहिती आहे. या चर्चेमध्ये एकत्रित येण्यासंदर्भात निर्णय झाला होता अशीही विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. दोन्ही पवारांच्या चर्चेनंतर पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या भेटी आणि चर्चा झाल्या होत्या पुढील चर्चा सुरू होती. आठ फेब्रुवारी रोजी या सर्व बाबतीत मधील घोषणा होणार होती. दोन्ही राष्ट्रवादींची विलीनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात सुरू होती. याबाबतची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये झाली असल्याची ही माहिती आहे. 8 फेब्रुवारीला याबाबतची घोषणा होणार होती मात्र त्याआधीच अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत निधन झालं. आता याबाबत काही निर्णय होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.