बीड : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी (Election) निवडणूक होत असून आता प्रचाराच्या तोफा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. स्थानिक नेत्यांच्या राजकीय भविष्यासाठी आता बडे नेतेही मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेही निवडणुकांसाठी प्रचार दौरे करत असून आज बीड आणि नांदेड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी त्यांनी सभा घेतल्या. यावेळी, मी कामाचा माणूस आहे, आधी करतो मग बोलतो असे म्हणत इतर नेते आणि त्यांची शहरं भिकारचोट असल्याचं अजित पवारांनी (Ajit pawar) म्हटलं. 

Continues below advertisement

मला जनतेने 6-6 वेळा उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, मंत्री केलं. सन 2017 नंतर 2022 ला निवडणूका लागायला पाहिजे होत्या. पण, कोरोना आल्यामुळे उशिर झाला. यापूर्वी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाकडे दुर्दैवाने लक्ष दिलं गेलं नाही. मी पालकमंत्री आहे, माझं लक्ष असतं, असे म्हणत स्थानिक मुद्द्यांना अजित पवारांनी हात घातला. बीडमध्ये आपण रेल्वे सुरू केली आहे, ती रेल्वे आपल्याला पुण्यापर्यंत आणि मुंबईपर्यंत न्यायची आहे. त्याशिवाय माझ्या बीड जिल्ह्याचा आणि अंबाजोगाईचा विकास होणार नाही. 1000 कोटी रूपये निधी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयासाठी देणार , असल्याची घोषणाच अजित पवारांनी अंबाजोगाईतून केली. 

बाकीचे नेते, त्यांची शहरं भिकारचोट

निवडणुकीसाठी 4 वर्षे कार्यकर्त्यांना थांबावं लागलं. या निवडणुकीतूनच कार्यकर्ता तयार होतो, म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप-प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या भागात करून दाखवलं तेव्हा तुमच्याकडे येऊन बोलतोय. मात्र, बाकीचे नेते, त्यांची शहरं भिकारचोट असतात‌, असे म्हणत अजित पवारांनी बीड जिल्ह्यातून इतर नेत्यांवर हल्लाबोल केला. अनेक पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद दिलं. आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच उपमुख्यमंत्री करून मला तिथे बसवलं.  हे वागणं बरं नव्हं हे लक्षात ठेवा, असे म्हणत नाव न घेता अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना लक्ष्य केलं. 

Continues below advertisement

लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार

आम्हाला जर मतदान केलं तरच लाडकी बहीण योजना चालू राहील, असा अपप्रचार केला जात आहे. मात्र, अशा धमक्याना घाबरू नये, हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिला. सोमवारी कंधार शहरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मला काहीजण सांगत आहेत की, आम्हाला मतदान दिलं तरच लाडकी बहीण योजना सुरु राहील, अशी कोणी भीती घालत असेल तर भीक घालू नका असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले.

हेही वाचा

ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा