सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे आपल्या धडाडीच्या कामासाठी ओळखले जातात. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वचक ठेवणारे नेते म्हणून अजित पवार परिचितआहेत. मात्र, बुधवारीअजितपवारांचेएककॉलरेकॉर्डिंगव्हायरलझालेअसूनकरमाळ्याच्यापोलिसउपअधिक्षक अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी फोनवरुन दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. अंजी कृष्णा यांनी फोनवर अजित पवारांना ओळखलं नाही, म्हणून रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोलसुनावत थेट व्हिडीओकॉलच केला. व्हिडीओ कॉल येताच अंजली कृष्णा बांधावरच बसल्या. माढ्याच्या (Solapur)कुर्डू गावात कारवाईसाठी अंजली कृष्णा आल्या असताना हा संपूर्ण प्रकार घडला आहे. त्यानंतर, हाकॉलसोशलमीडियावरव्हायरलझालाअसूनबेकायदेशीरकामालाअजितपवारांनीपाठबळदेतमहिलाअधिकाऱ्याचाअपमानकेल्याचाआरोपशेतकरीसंघटनेनंकेलाआहे.

माढा तालुक्यातील कुर्डू या गावात बेकायदेशीरमुरमच्या गाड्या चालवल्या जातात. बेकादेशीर मुरूम उपसा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे तेथील डीवायएसपींनाफोनकरुन सोडून द्यायला सांगतात, माझा आदेश आहे म्हणतात. म्हणजेच, अजित दादा दादागिरी, धटींगशाही करत आहेत. एकीकडे लाडक्या बहि‍णींचा लाडका भाऊ म्हणतात अन् दुसरीकडे एका महिला अधिकाऱ्यासोबत दमदाटी करतात, असे म्हणत अजित पवारांनी फोनवरुन केलेल्या संवादाचा व्हिडिओव्हायरल झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

अजित पवारांनी फोन केल्यानंतर कुर्डू गावातील काही गुंडांनी संबंधित अधिकाऱ्यांना पळवून लावलं, गावातील दोन तलाठ्यांना मारहाण केली. गावात तब्बल 3 तास हा प्रकार सुरू होता. चुकीच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दबाव टाकला जातो, पण कुठलाही कारवाई होत नाही. त्यामुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी तातडीने महिलांची माफी मागून राजीनामा द्यावा. ज्या पद्धतीने अजित पवारांनी महिला अधिकाऱ्यांशी भाषा वापरली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनासंबंधितानेधमकवण्याचा प्रयत्न केला याची चौकशी करुनसंबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे यांनी केली आहे. तसेच, पुढील 8 दिवसांत कारवाई न झाल्यास हजारोशेतकऱ्यांसहसोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

दरम्यान, महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत अजित पवारांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओनंतर अजित पवारांवर काही जणांकडून टीकाही केली जात आहे. त्यात, शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा

काय सांगता? चक्क विहिरीतून निघतंय गरम पाणी, हाताला बसतोय चटका; पाहायला ग्रामस्थांची गर्दी, काय आहे कारण?