Ajit Pawar धाराशिव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Maharashtra Local Body Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका (ZP Election) पुढे जाण्याची शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेतील आरक्षणाबाबत कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणाने निवडणूक लांबण्याची शक्यता अजित पवारांनी धाराशिव येथे बोलताना व्यक्त केलीय.

Continues below advertisement


Ajit Pawar : कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते


जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वकिलांनी ही माहिती दिल्याचे अजित पवारांनी सांगितलं. कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते, असं अजित पवार म्हणाले. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणूक विविध कारणामुळे लांबणीवर पडली. जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार यासाठी अनेक इच्छुक वेटिंगवर आहेत. मात्र पुन्हा एकदा निवडणूक लांबन्याची शक्यता वर्तवली जात असताना अजित पवारांनी यावर भाष्य करत हि माहिती दिली.


Nagarpalika Election Dates : निवडणुकीच्या तारखा जाहीर


राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.


Maharashtra Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल


नामनिर्देशन पत्र - 10 नोव्हेंबर


अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर


छाननी - 18 नोव्हेंबर


अर्ज माघारी घेण्याची तारीख - 21 नोव्हेंबर


निवडणूक चिन्ह वाटप - 26 नोव्हेेबर


मतदान - 2 डिसेंबर


निकाल - 3 डिसेंबर


डिसेंबरला निकाल


Maharashtra Total Voter : एकूण किती मतदार?


एकूण मतदार - 1 कोटी 7 लाख 3 हजार 576


महिला मतदार - 53 लाख 22 हजार 870


नगरपालिका उमेदवारांसाठी खर्च मर्यादा किती?


अ वर्ग


अध्यक्षपद - 15 लाख


नगरसेवक - 5 लाख


ब वर्ग


अध्यक्षपद - 11 लाख 25 हजार


नगरसेवक - 3 लाख 50 हजार


क वर्ग


अध्यक्षपद - 7 लाख 50 हजार


नगरसेवक - 2 लाख 50 हजार


नगरपंचायत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा किती?


अध्यक्षपद - 6 लाख


नगरसेवक - 2 लाख 25 हजार


विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक


कोकण - 17


नाशिक -49


पुणे -60


संभाजीनगर -52


अमरावती -45


नागपूर -55


आणखी वाचा