Ajit Pawar on Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि निलेश लंके (Nilesh Lanke)  निवडूनही आले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केला. नगर लोकसभेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, निलेश लंकेंच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गौप्यस्फोट केलाय.


मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी


अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके सुरुवातीला माझ्याकडून तयार होते. मात्र मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी, निलेश लंके यांनी केली होती, असं अजित पवार यांनी सांगितलं. निलेश लंकेंच्या उमेदवारीबाबत मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ती जागा सोडू शकले नाही. ही जागा धोक्यात आहे, असेही मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं. मात्र भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही. 


माझ्या जवळच्या लोकांच्या क्रशर आणि इतर खाणी बंद केल्यामुळे मला त्याचा फटका बसणार होता


पालकमंत्र्यांनी मला मोठ्या प्रमाणावर त्रास दिला होता. माझ्या जवळच्या लोकांच्या क्रशर आणि इतर खाणी बंद केल्यामुळे मला त्याचा फटका बसणार होता. त्यामुळे मी त्याच्या सोबत काम करु शकत नाही, अस निलेश लंके यांनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवली असल्याचं अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना सांगितलं. 


लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव 


लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली. या निवडणुकीत निलेश लंके यांना 624797 इतकी मतं मिळाली तर सुजय विखेंनी 595868 मिळवली. त्यामुळे विखेंचा जवळपास 35 हजार मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंनी निलेश लंकेंना इंग्रजी येत नाही, या मुद्द्यावर खिल्ली उडवली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीमध्ये शपथ घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Vishalgad Dispute : संभाजीराजेंच्या भूमिकेनंतर झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध, शाहू महाराज ढाल बनून मैदानात; नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी