Ajit Pawar in Baramati : "आता बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही एवढ कडक वागतात आणि अशा गोष्टीला कस पाठीशी घालतात? तेव्हा माझापण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते." असं मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते बारामतीच्या निरावागज येथील सभेत बोलत होते. 


अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले,  अहिल्याबाईंनी चांगल काम केलं,कारभार चांगला केला, त्यामुळे अहमदनगर जिल्हा तालुका नाव बदललं आणि अहिल्यानगर नाव दिलं.आपण सरकारमध्ये नसतो तर उन्हाळ्यात पाणी मिळालं नसत,दुष्काळ पडला आहे. अनेक विकास कामे सुरू आहेत. कुठल्या कामाला पैसे मिळाले नाही तर आचारसंहिता  संपल्यानंतर पैसे देण्यात येतील. गाय दूध दर वाढ राज्य सरकार देत आहे,दुधात मिक्सिंग दुधात करू नका,असाला पैसा टिकत नसतो,भेसळ युक्त घालू नका, असंही आवाहनही अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. 


राज्याच्या भल्या करता काही राजकीय निर्णय घ्यावा लागला


अजित पवार (Ajit Pawar) पुढे बोलताना म्हणाले, उसाचा दर यंदा मोदी सरकार यांनी वाढवला आहे. आपल्यावर आय टी ची 10 हजार कोटी कर्ज होते मोदी आणि अमित शाह यांनी साखर कारखाने पैसे कमी केले. रात्री 10 वाजायच्या आत सभा संपावयाच्या आहेत. अजून दोन सभा आहेत. नेहमी मला तुम्ही भरभकम पाठींबा दिला. राज्याच्या भल्या करता काही राजकीय निर्णय घ्यावा लागला. मी अनेक वर्षी काम करतोय.काही लोक निवडणूक काळात भाव वाढवून देतात आणि अडचणीत येतात.


आपल्या विचारांचं सरकार असल्याने एवढं काम करू शकलो


पाणी कमी आहे, ठिबक वापरा,फार बोभाटा करू नका. आपल्या विचारांचं सरकार असल्याने एवढं काम करू शकलो. आपल्याकडे फायनान्स मिनिस्टर आहे म्हणून हे सगळ करू शकलो. बारामती,माळेगाव यांना चांगला निधी मिळवून दिलाय. सोलर पंप साडे आठ लाख पंप देण्याचा विचार सरकार करतोय.  यंदाच्या बजेटमध्ये धनगर ओबीसी बहुजन यांना घरे देणार आहोत, असं आश्वासनही अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी: ममता बॅनर्जी ट्रेडमिलवर चालताना घसरुन पडल्या, डोक्याला गंभीर दुखापत