Aditya Thackeray On Shinde Group: भाजपचेच लोक शिंदे गटाच्या घोटाळ्याची कागदपत्रे आम्हाला देतात, असं गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. वरळी येथे आयोजित निर्धार मेळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''उद्या जेव्हा अधिवेशन सुरू होईल, तेव्हा त्यांचीच (शिंदे गट) मित्र पक्षातले (BJP) लोक आपल्याकडे येतात आणि घोटाळ्याचे कागद देतात.''
Aditya Thackeray On Shinde Group: 'बॅनर काढले तरी कुणी आपल्याला मनातून काढू शकत'
या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ''मला सांगितले की आपले होर्डिंग्ज काढले. मी त्यांना सांगितलं की डर अच्छा है. सरकारी यंत्रणा वापरल्या जात आहेत. सामान्य शिवसैनिकांना हे गद्दार सरकार घाबरलेत. बॅनर काढले तरी कुणी आपल्याला मनातून काढू शकत नाही.
Aditya Thackeray On Shinde Group: ''त्यांची खुर्च्यांची गर्दी दाखवली, आता ही शिवसैनिकांची गर्दी दाखवा''
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील वरळीत सभा झाली होती. त्या सभेत अनेक खुर्च्या रिकामी दिसत होत्या. यावरूनच शिंदे यांना टोला लगावत आदित्य ठाकरे म्हणाले की, ''गद्दार लोकांनी नाव चोरलं. चिन्हे चोरलं. पण या खुर्च्या चोरू शकत नाही.'' माध्यमांना आवाहन करत ते म्हणाले, ''त्यांची खुर्च्यांची गर्दी दाखवली, आता ही शिवसैनिकांची गर्दी दाखवा.''
Aditya Thackeray On Shinde Group: 'भाजप सरकार दिल्ली समोर झुकावयचे काम करत आहे'
शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ''ज्या मुंबईला आपण जपत आलो आहोत. त्या मुंबईला हे भाजप सरकार दिल्ली समोर झुकावयचे काम करत आहे. जी कामे आपण करत होतो, ती बंद करायचा प्रयत्न यांनी केला. ते म्हणाले, या वरळीत कुठे ना कुठे चांगले काम झाले आहे. मी नाही शिवसेनेने इथे काम केले आहे.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, या गद्दार सरकारने कंत्राटदारांची लॉटरी काढली. आज पण काही तरी रस्त्यांची कामे काढली. हा मोठा रस्ते घोटाळा आहे. मी हा घोटाळा बाहेर काढला, तेव्हा आपल्या मुळे मुंबईकरांचे साडे चारशे कोटी रुपये वाचले. पाचशे चौरस फुटाची घरे आपण करमुक्त केली. सरकारमध्ये आलो तेव्हा शेतकऱ्यांचा कर्ज मुक्तीचा निर्णय घेतला. ते म्हणाले, कोविड काळात आपण साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आणली. आता गेल्या साडे सहा महिन्यात एक तरी गुंतवणूक आली का? असा सवाल त्यांनी राज्य सरकाराला केला आहे.