नवी दिल्ली : अभिजीत दिपके यांच्या नेतृत्त्वातील कॉकरोच जनता पार्टीनं संघटना वाढीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यााच भाग म्हणून सीजेपीनं शनिवारी त्यांच्या संघटनेच्या विस्ताराचा भाग म्हणून झोनल प्रभारी जाहीर केले. तर, 10 राज्यात राज्य आणि प्रादेशिक समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत.  

Continues below advertisement

सीजेपीनं क्षितिज पगार यांना पश्चिम विभागाचे प्रभारी, डॉ. विवेक सांगवान यांना उत्तर विभागाचे प्रभारी नियुक्त केलं आहे. मुहम्मद जनैद आणि गीगराज जोरली यांना उत्तर विभागाच्या समन्वय समितीचे सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे.  

कॉकरोच जनता पार्टीनं जम्मू कश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, ईशान्य भारत (नॉर्थ ईस्ट), महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या राज्यात समन्वय समित्या स्थापन केल्यात.

Continues below advertisement

सीजेपीचा संघटना बांधणीवर जोर

सीजेपीच्या उत्तर प्रदेश समितीत 16 सदस्य आहेत. महाराष्ट्रात 15, झारखंडमध्ये 14, ईशान्य भारतात 14, बिहारमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 12, हरियाणामध्ये 6, राजस्थानमध्ये 5, उत्तराखंडमध्ये 6 आणि जम्मू काश्मीरमध्ये 4 सदस्य आहेत. सीजेपीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार या समित्या  त्यांच्या विभागात संघटनेच्या कार्यक्रमांची आखणी करेल. प्रत्यक्ष जमिनीवर संघटना बांधणी करणे, प्रभाव वाढवणे ही कामं सीजेपी करेल.  

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीनंतर सीजेपीची सुरुवात मे महिन्यात झाली होती. कॉकरोच शब्द सरन्यायाधीशांनी उच्चारला होता, त्याच शब्दाचा वापर करत अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी नावानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खातं काढलं होतं.सीजेपीचा प्रयोग लोकप्रिय ठरला.  

सीजेपीचं 36 दिवस आंदोलन, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा

सीजेपीनं नीट पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात नवी दिल्लीतील जंतरमंतरवर 36 दिवस आंदोलन केलं होतं. या आंदोलनात पेपरफुटी जबाबदारी निश्चित व्हावी आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची  मागणी सेजीपेनं केलेली. अखेर 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर सीजेपीनं इतर मुद्दे हातील घेतले होते. त्याज स्कूल ठीक करो अभियान होतं. निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असलेल्या एसआयरमधील त्रुटींबाबत सीजेपीनं आवाज उठवला होता.

सीजेपीनं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. सीजेपीनं 1 नोव्हेंबला आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीला पाठिंबा दिला होता.