Maharashtra Cabinet Expansion: राज्यात रविवारी संध्याकाळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपचे 19 शिवसेना शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार गटाच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. दरम्यान राज्यभर गाजलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसींची भूमिका मांडणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. महायुतीतून छगन भुजबळ यांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा असतानाच या नाराजी नाट्यात भर पडली आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार  मी नाराज नाही, अल्पसंख्यांक समुदायाचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात हसीन मुश्रीफ आहेत असं वक्तव्य केलंय. यावर हसन मुश्रीफांनीही आम्ही एकत्र भुजबळांकडे जाऊ आणि त्यांची नाराजी दूर करू असं म्हणत नाराजीची धूळ झटकायचा प्रयत्न केल्याचं दिसलं.


मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानं भूजबळ नाराज?


विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मराठा ओबीसी आरक्षण विषय चांगलाच तापला होता. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरंगे पाटील करत होते. तर छगन भुजबळ यांनी ओबीसी चळवळीचे नेतृत्व करत मैदानात उतरले होते. विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यांच्या भूमिकेकडे ही सर्वांचे लक्ष आहे. 


भूजबळांच्या नाराजीवर सत्तार, मुश्रीफ म्हणाले..


अल्पसंख्यांक समुदायाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादीचा छगन भुजबळांची मंत्रीपदी वर्णी लागणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याची एकच चर्चा आहे. दरम्यान शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मी नाराज नसल्याचे सांगत अल्पसंख्यांक समुदायाचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात हसेन मुश्रीफ आहेत असं वक्तव्य केलंय. तर हसन मुश्रीफांनी भुजबळांच्या नाराजीवर आम्ही एकत्रित जाऊन भुजबळांची नाराजी दूर करू असं सांगितलं आहे. राज्यात ओबीसी परिषदा आणि बैठकींमध्ये छगन भुजबळांचा सक्रिय सहभाग होता. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना डावलण्यात आले. अजित पवार भुजबळांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनीही भुजबळांच्या नावाला विरोध दर्शविल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या जागी नाशिकमधून नरहरी झिरवळ आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.


हेही वाचा:


Maharashtra Cabinet Minister List 2024: कॅबिनेटपासून राज्यमंत्रीपर्यंत...फडणवीसांची नवी टीम; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी