West Bengal: अभिनेता ते राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांनी बुधवारी यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले आहेत की, टीएमसीचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मी स्वतः 21 आमदारांशी चर्चा करत असल्याचा दावा त्यांनी केला. बुधवारी कोलकाता येथील भाजप पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मिथुन यांनी हा दावा केला आहे. ते पत्रकारांना म्हणाले की, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज जाणून घ्यायची आहे का? माझ्याकडे टीएमसीचे 38 आमदार आमच्या संपर्कात असल्याची ब्रेकिंग न्यूज आहे.


'दंगलीत भाजपचा हात असेल पुरावे द्या'


याशिवाय मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, दंगलींमध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. भाजप दंगली घडवते, असा आरोप केला जातो. पण मला अशी घटना दाखवा की, या दंगलींमध्ये भाजपचा हात आहे. दुसरीकडे मंत्री पार्थ चॅटर्जीच्या मुद्द्यावर मिथुन म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध पुरावे नाहीत तर आराम करा आणि झोपा, काहीही होणार नाही. पण पुरावे त्यांच्या विरोधात असतील तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही.






भारतातील 3 मोठे स्टार मुल्सिम, मात्र हिंदू त्यांच्यावर प्रेम करतात: मिथुन 


भाजपच्या मुस्लिम द्वेषाच्या प्रश्नावर मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, भारतातील टॉप थ्री स्टार हे मुस्लिम आहेत. सलमान, शाहरुख आणि आमिर! हे कसं  शक्य आहे? 18 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. जर भाजप त्यांचा तिरस्कार करत असेल किंवा हिंदू त्यांच्यावर प्रेम करत नसतील, तर त्यांचे चित्रपट या राज्यांमधून सर्वात जास्त कलेक्शन कसे करू शकतात. याशिवाय शिक्षक भरती घोटाळ्याबाबत मिथुन म्हणाले की, शिक्षक भरती घोटाळा 100 कोटींचा नसून 2000 कोटींचा आहे.