गांधीनगर (गुजरात) : भाजपकडून माझे वडील जरी निवडणुकीला उभे राहिले, तरी मी भाजपचं समर्थन करणार नाही, असे पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने म्हटलं आहे. तो एबीपी माझाशी बोलत होता.
"आम्ही मुद्द्यांवर लढत आहोत. मी माझ्या स्वार्थासाठी लढणार नाही, समाजाच्या स्वार्थासाठी लढेन. काँग्रेसने आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर ठीक. मात्र भाजपकडून माझे वडील जरी लढले, तरी भाजपचं समर्थन करणार नाही.", अशा परखड शब्दात हार्दिक पटेलने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राहुल गांधींसोबतच्या कथित भेटीबाबत बोलताना हार्दिक पटेल म्हणाला, "सीसीटीव्ही फूटेजमध्ये राहुल गांधी नाहीत. मी राहुल गांधींना भेटलो नाही. अशोक गहलोत यांना भेटलो. भाजप आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते आहे. आमचं खासगी आयुष्य धोक्यात आहेत. आम्ही कुणाला भेटत आहोत, हे समोर कसं येऊ शकतं? आम्ही ताज हॉटेलविरोधात तक्रार दाखल करण्याचीही तयारी करत आहोत."
हार्दिक पटेल पुढे म्हणाला, "मी लवकरच राहुल गांधींना भेटेन आणि मोठा धमाका करेन. भाजप घाबरली आहे. भाजपला जाणून घ्यायचं आहे की, हार्दिक काँग्रेसला भेटला, तर त्यांच्यात काय चर्चा झाली. तुम्ही राहुल गांधींनाही विचारा की, ते मला भेटले की नाहीत ते."
"अशोक गहलोत यांना भेटलो होतो. त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यांनी सांगितलं, आमचं सरकार आल्यास घटनात्मक मार्गाने आरक्षण देऊ.", असेही हार्दिक पटेलने सांगितले.
बाप जरी भाजपकडून लढला, तरी मत देणार नाही : हार्दिक पटेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Oct 2017 03:54 PM (IST)
हार्दिक पटेल पुढे म्हणाला, "मी लवकरच राहुल गांधींना भेटेन आणि मोठा धमाका करेन. भाजप घाबरली आहे. भाजपला जाणून घ्यायचं आहे की, हार्दिक काँग्रेसला भेटला, तर त्यांच्यात काय चर्चा झाली. तुम्ही राहुल गांधींनाही विचारा की, ते मला भेटले की नाहीत ते."
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -