Shah Rukh Khan Pathan Box Office Collection : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' बहुचर्चित (Pathan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस पूर्ण झाले असले तरीही चाहत्यांमध्ये शाहरुखची आणि त्याच्या सिनेमाची क्रेझ कायम आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
'पठाण' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील!
'पठाण' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. आता पहिल्या वीकेंडआधीच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या चौथ्या दिवशी 'पठाण'ने 50 कोटींची कमाई केली आहे. आता रिलीजच्या पाचव्या दिवशी वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करेल.
'पठाण'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Pathan Box Office Collection)
शाहरुख खानच्या 'पठाण'ने वर्षाच्या सुरुवातीलाच हिंदी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. त्यामुळे हे वर्ष बॉलिवूडकरांसाठी नक्कीच सुखद असणार आहे. 'पठाण'ने ओपनिंग डे ला 55 कोटी, दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी आणि चौथ्या दिवशी 50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 211 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस - 55 कोटी
- दुसरा दिवस - 68 कोटी
- तिसरा दिवस - 38 कोटी
- चौथा दिवस - 50 कोटी
- एकूण - 211 कोटी
वन्स अ किंग ऑलवेज अ किंग....
'पठाण' या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. शाहरुख खान या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत असल्याने तोदेखील सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होता. पण रिलीजआधी या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर शाहरुखने या सिनेमाचं प्रमोशन करणं बंद केलं. पण आता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहते सिनेमागृहात जाऊन टाळ्या, शिट्ट्या, आक्रोश करत सिनेमाचा आनंद घेत आहेत. शाहरुखवर निबंधाच्या निबंध लिहित आहेत. आज एक वर्ग त्याच्या विरोधात विनाकारण रान माजवत असताना तो त्याच्या सिनेमाचं तिकीट हजारो रुपये ठेवतो आहे. पण तरीही चाहते हजारो रुपये खर्च करत त्याचा सिनेमा पाहत आहेत. त्यामुळे 'वन्स अ किंग ऑलवेज अ किंग' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
संबंधित बातम्या