Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा आज (25 जानेवारी 2023) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. पण आता दिवस संपत आला असून या सिनेमाच्या ओपनिंग डे कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


ओपनिंग डेला 'पठाण' किती कमाई करणार? (Pathaan Opning Day Collection)


सिने विश्लेषक रोहित जयसवाल यांच्या ट्वीटनुसार, 'पठाण' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी 56 कोटींची कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर सिने विश्लेषक सुमित कडेलने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपनिंग डेला 'पठाण' 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करू शकतो. त्यामुळे एकंदरीतच रिलीजच्या पहिल्या दिवशी (Pathaan Box Office Collection) 'पठाण' 50 कोटींचा गल्ला जमवू शकतो. 










'पठाण'मध्ये भाईजानची लक्षवेधी झलक!


'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडियादेखील मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. तर भाईजान सलमान खानची (Salman Khan) लक्षवेधी झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याने या सिनेमात टायगरचे पात्र साकारले आहे. 


'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई!


'पठाण' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने 24 कोटींपेक्षा अधिक कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. पीव्हीआर (PVR) 9.40 कोटी, आयनॉक्स 7.05 कोटी (Inox) आणि सिनेपोलिस (Cinepolis) 3.90 कोटींची कमाई सिनेमाने केली आहे. एकूण 20.35 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवला आहे. 


शाहरुखचे आगामी सिनेमे...


शाहरुखसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचा बहुचर्चित 'पठाण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. 'पठाण'नंतर शाहरुखचे 'डंकी' आणि 'जवान' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच राजकुमार हिरानी आणि शाहरुखने एक व्हिडीओ शेअर करत 'डंकी' सिनेमाची घोषणा केली होती. तसेच 'जवान' सिनेमातील शाहरुखचा लुकदेखील समोर आला आहे. 'पठाण'प्रमाणे या सिनेमातदेखील प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. एटलीने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं असून विजय सेतुपती या सिनेमात नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. 


संबंधित बातम्या


Pathaan Leaked Online : शाहरुखसह 'पठाण'च्या टीमला मोठा फटका, रिलीजच्या काही तास आधीच....