Parbhani ZP elections 2022 : परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण 60 जागा जागांची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी लहान मुलांच्या हाताने आरक्षणाच्या चिठ्या काढून ही सोडत जाहीर केलीय. या आरक्षण सोडतीने मात्र भल्याभल्यांना घाम फुटलाय. एकूण 9 तालुक्यातील 60 जागा कोणत्या प्रवर्गाला सुटल्या आहेत ते पाहुयात..
परभणी तालुका
झरी गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
टाकळी बोबडे-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
असोला-सर्वसाधारण महिला,
टाकळी कु.-सर्वसाधारण महिला,
पेडगाव-सर्वसाधारण,जांब-अनुसूचित जाती,सिंगणापूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
पिंगळी-सर्वसाधारण महिला,
लोहगाव-अनुसूचित जाती महिला,
पोखर्णी-सर्वसाधारण महिला,
दैठणा-सर्वसाधारण.
जिंतूर तालुका
वझुर बु. जि.प.गट सर्वसाधारण,
वाघी धानोरा-अनुसूचित जाती,
सावंगी म्हाळसा-सर्वसाधारण महिला,
आडगाव बाजार-सर्वसाधारण महिला,
भोगाव-अनूसूचित जाती महिला,
पुंगळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
वरुड-अनुसूचित जमाती महिला,
चारठाणा-सर्वसाधारण,
बोरी-अनुसूचित जाती,
वस्सा - नागरिकांचा मागास प्रवर्ग
कौसडी- सर्वसाधारण
मानवत तालुका
कोल्हा-सर्वसाधारण,
ताडबोरगाव-सर्वसाधारण,
केकरजवळा-सर्वसाधारण महिला,
रामपुरी बु. -नागरिकांचा मागास
सेलू तालुका
चिकलठाणा-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
वालूर-सर्वसाधारण महिला,
कुपटा-सर्वसाधारण,
हादगाव खु.-सर्वसाधारण महिला,
रवळगाव-सर्वसाधारण महिला,
देऊळगाव गात-सर्वसाधारण महिला.
पाथरी तालुका
हादगाव बु.-सर्वसाधारण,
देवनांद्रा-सर्वसाधारण,
कासापुरी-अनुसूचित जाती महिला,
बाभूळगाव-सर्वसाधारण,
लिंबा-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
सोनपेठ तालुका
शेळगाव महाविष्णू-सर्वसाधारण,
नरवाडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
डिघोळ-सर्वसाधारण महिला,
उखळी बु.-सर्वसाधारण महिला
पूर्णा तालुका
एरंडेश्वर-सर्वसाधारण महिला,
चुडावा-सर्वसाधारण महिला,
कावलगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला,
गौर- सर्वसाधारण,
कानडखेड-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
ताडकळस-सर्वसाधारण,
वझूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग.
पालम तालुका
रावराजूर-सर्वसाधारण,
पेठशिवणी-सर्वसाधारण महिला,
पेठपिंपळगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
चाटोरी-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
बनवस - अनूसूचित जमाती.
गंगाखेड तालुका
धारासूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
महातपूरी-अनूसूचित जाती महिला,
मरडसगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
इसाद-अनूसूचित जाती,
गुंंजेगाव-सर्वसाधारण,
कोद्री-सर्वसाधारण
राणीसावरगाव-सर्वसाधारण महिला
दरम्यान आज जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीने अर्ध्या पेक्षा जास्त विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांना आपला गट बदलावा लागणार असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यमान सदस्यांना आता नवीन मतदार संघ शोधून तिथे आपले बस्तान बसवावे लागणार आहे. ज्याला मोठे आर्थिक गणित आता लावावे लागणार आहेत..