परभणी: बीडमधील इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला, पण वाल्मिक कराडवर मोक्का का लावण्यात आला नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. संसदेच्या अधिवेशनामध्ये बीज आणि परभणी हे दोन्ही विषय मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.


दोन्ही घटना अमित शाहांच्या कानावर घातल्या


परभणी आणि बीडच्या घटना माणुसकीला लाजविणाऱ्या आहेत. परभणी आणि बीडची घटना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घातली आहे आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या दोन्ही घटनेत कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. 


परभणीच्या घटनेमध्ये सरकार काहीतरी वेगळं बोलतं आणि वास्तव वेगळं आहे. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या न्यायालयीन कोठडीमध्ये झाली आहे. देशमुख कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंब या प्रकरणात आम्हाला राजकारण करायचे नाही. दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


वाल्मिक कराडवर मोक्का का लावला नाही? 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "बीड घटनेतील इतर आरोपींवर मोक्का लावला असेल तर वाल्मिक कराडावर का लावला नाही? वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ईडीच्या केसमध्ये वाल्मिक कराडचे नाव एक नंबरला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर तात्काळ अटक झाली. मग यांना का होत नाही? वाल्मिक कराडकडे कोणाची माहिती आहे. त्यामुळे त्यांना स्पेशल ट्रिटमेंट दिली जाते. ज्या ज्या मागण्या नेत्यांनी केल्या आहेत, आरोप केले आहेत, त्याचे उत्तर तपासले पाहिजे."


धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा


बीड प्रकरणात जो आरोपी फरार आहे त्याला तात्काळ पकडले पाहिजे. धनंजय मुंडे यांनी माणुसकीच्या नात्याने आणि नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. वाल्मिक कराड कुठून येतो हे पोलिसांना माहीत होत नाही. हे गृह खात्याचे नाही तर सरकारचे अपयश आहे असंही त्या म्हणाल्या. 


ही बातमी वाचा: