Rajesh Tope : परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Lok Sabha Constituency) मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांना मोठा धक्का दिला आहे. टोपे यांचे 18 कट्टर समर्थकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.


टोपे यांचे समर्थक असलेले जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र पवार (Mahendra Pawar) यांच्या नेतृत्वाखाली 2 जिल्हा परिषद सदस्य अन तिर्थपुरी नगर पंचायतच्या नगराध्यक्ष अलका चिमणे यांच्यासह 11 नगरसेवकांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत धाराशिव येथे त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. 


टोपेंसह महाविकास आघाडीला मोठा धक्का


यामुळे ऐन निवडणुकीत टोपे यांच्यासह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार आज धाराशिव येथे होते. तेथेच हा पक्षप्रवेश पार पडलाय. यावेळी परभणीतील नेते राजेश विटेकर यांच्यासह आमदार विक्रम काळे,सतीश चव्हाण आदी उपस्थित होते. 


यांनी केला प्रवेश 


तीर्थपुरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा अलका अण्णासाहेब चिमणे, सभापती घनशाम चिमणे, सुधाकर सर्जेराव मापारे,तुळशीराम रंगनाथ वानखडे, बाळासाहेब बोबडे, सुभाष चिमणे, दिपक चिमणे, श्रीकृष्ण बोबडे, सुमण कुंडलिक कासार, लक्ष्मण चव्हाण,चंद्रकांत अंकुश बोबडे, शे जिलानी शे जाफर तर जालना जिल्हा परिषदेतील महेंद्र भाऊ पवार, जयमंगल जाधव, राज देशमुख जाधवराव, भास्करराव वराडे, मनोहर शिंदे यांचा समावेश आहे.


अजितदादांचे शरद पवारांना प्रत्युत्तर 


बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारादरम्यान अजित पवारांनी मतदारांना कचाकचा मतदान करण्याचे आवाहन केले होते. यावरून शरद पवार यांनीही अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. काही लोकांनी कसे मतदान करायचे हे तुम्हाला सांगितले. पण मी तसे सांगणार नाही. देणे घेणे करून मत मागण्याची आमची भूमिका नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. आता अजित पवारांकडून शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अजित पवार म्हणाले की, आम्ही कोणतेही प्रलोभन दिलेले नाही. उमेदवार हा विकास करण्याकरिता निवडून द्यायचा असतो. काही जणांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की, आम्ही निवडून आलो तर महिलांसाठी हे हे करू. त्यांनी देखील सांगताना सांगितलं की, पटापटा अकाउंटमध्ये पैसे येतील, मग हे प्रलोभन नाही का? विकास काम करायची संधी आम्हाला द्या आणि त्यासाठी ग्रामीण भागाच्या भाषेत मी बोललो, असे ते म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या 


'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार


Ajit Pawar Vs Sharad Pawar :बारामतीत समारोप सभेसाठी शरद पवारांना शोधावी लागणार नवीन जागा; अजित पवारांमुळे शिरस्ता खंडित