जालना : राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. त्यामुळे, ओबीसी नेत्यांनी एकत्र येत जरांगेच्या आंदोलनाविरुद्ध प्रतिआंदोलन केलं. ओसीबी नेते लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडगोद्री येथे आंदोलनासाठी मंडप उभारत उपोषण केले होते. त्यातून, लक्ष्मण हाकेंचं नेतृत्व उदयास आल. त्यानंतर, सातत्याने त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत आपल्या ओबीसीचा लढा पुढे नेण्याचं काम केलं आहे. त्यामुळे, परभणीत (Parbhani) ओसीबी समाज बांधवांनी आज लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना चक्क फॉर्च्युनर कार गिफ्ट केली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना परभणीच्या राणीसावरगाव येथील ओबीसी बांधवांनी महागडी अशी फॉर्च्यूनर लेजेंडर कार गिफ्ट केली आहे. राणीसावरगाव येथील रेणुका मातेच्या मंदिरासमोर आज ही गाडी भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना हाकेंनी समाजाचं ऋण व्यक्त केलं. तसेचस परभणी आणि नांदेडच्या बॉण्ड्रीवर जिथे माझी गाडी फोडण्यात आली होती तिथेच ही गाडी भेट देण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आज राणीसावरगावमध्ये ही गाडी मला भेट देण्यात आली त्याबद्दल समाजाचा ऋणी असल्याचं हाके यांनी म्हटलं. समाजाचे कार्य हे पुढेच घेऊन जाणार, मला एसीमध्ये राहायची सवय नाही. मात्र, समाजाच्या कार्यासाठी मला ही गाडी देण्यात आलीय, त्याचा वापर मी करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
हाकेंनी, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला असून ते काहीही बरळत आहेत. मनोज जरांगे ज्यादिवशी ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, अशी आडेलंतट्टूपणाची भूमिका घेऊन मुंबईकडे निघेल, त्यादिवशी ओबीसी बांधवही माळेगाव येथून मुंबईकडे लाँग मार्च काढतील, असा इशाराही यावेळी लक्ष्मण हाकेंनी दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेट दिला असून मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडक देणार असल्याचे म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस
हेही वाचा
कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळली; मंत्र्याच्या मुलासह 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी