Bus accident news : परभणी जिल्ह्यात दुचाकीस्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस थेट नाल्यात गेल्याची घटना घडली आहे. बस चालक वाहकासह 70 ते 75 प्रवासी बालबाल बचावले आहेत. दरम्यान, बस ज्या नाल्यात गेली त्याच्या काही फुटांवरच विजेचा डीपी देखील होता. परभणीच्या मानवत वळण रस्त्यावर ही घटना घडली आहे.
सर्व प्रवासी सुखरुप
समोर आलेल्या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या नादात बसच्या चालक वाहकासह 70 ते 75 प्रवासी बालबाल बचावल्याची घटना परभणीच्या मानवत येथे घडलीय. मानवत शहरातील वळण रस्त्यावर असलेल्या रेणुका मंगल कार्यालयासमोरुन MH 20 BL 3860 या क्रमांकाची बस परभणीहून बीडकडे जात होती. यावेळी अचानक समोर दुचाकीस्वार आला त्याला वाचवण्याच्या नादात बस थेट रस्त्याच्या खाली असलेल्या नाल्यात गेली. महत्वाचे म्हणजे काही फुटांवर तिथे विजेचा डीपी होता. गाडी अलीकडेच थांबल्याने पुढील अनर्थ टळला सुदैवाने बसमधील कुणालाच काही झाले नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून, दुसऱ्या बसच्या माध्यमातून पुढे निघून गेले.
महत्वाच्या बातम्या: