Parbhani News : सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं उष्णतेच्या झळा लागत आहेत, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा (Temperature) पारा 40 अंशाच्या पुढं गेलाय. त्यामुळं नागरिकांना त्रासाला सामोर जावं लागत आहे. अशातच दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी पाणीटंचाईचं संकट निर्माण झालंय. विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाच्या (Drought) झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत. दुसरीकडं पाणीटंचाईमुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. अशातच जनावरांच्या चाऱ्याचे दर देखील वाढताना दिसत आहेत. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत.
चाऱ्याचे भाव वाढल्याने पशुपालक अडचणीत
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पशुपालक चिंतेत आहेत. पाणी टंचाईच्या झळांसह आता चारा भाववाढीचे संकट त्यांच्यासमोर आहे. चाऱ्याचे भाव वाढल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ही दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने भाववाढीच्या संकटाला पशुपालकांना सामोरे जावे लागत आहे. कडबा, हिरवा चारा तसेच सरकी पेंडीचे भावही वाढले आहेत. त्यामुळं जनावरं जगवायची कशी? असा प्रश्न पशुपालकांसमोर पडलाय.
कोणत्या चाऱ्यात कीती झाली वाढ?
हिरवा चारा
पहिल्यांदा हिरव्या चाऱ्याच्या 100 पेंड्या 1500 ते 1600 रुपयांना येत होत्या. सध्या यामध्ये मोठी वाढ झालीय. आता हिरव्या चाऱ्याच्या 100 पेंड्या 1900 ते 2000 रुपयांना येत आहेत. यामध्ये सध्या 300 ते 400 रुपयांची वाढ झाली आहे.
कडबा
कडब्याच्या दरातही वाढ झालीय. पहिल्यांदा कडब्याच्या 100 पेंड्या 1600 ते 1700 रुपयांना येत होत्या. आता यामध्ये वाढ झालीय. आता कडब्याच्या 100 पेंड्या 2000 ते 2100 रुपयांना मिळतात. कडब्यातही 300 ते 400 रुपयांची वाढ झालीय.
विहीरी आणि बोअरवेलची पाणी पातळी गेली खाली
मागील वर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी राहीलं होतं. त्यामुळं धरण असेल तलाव असतील यामध्ये पाण्याचा साठा हा कमी प्रमाणात राहिला होता. तसेच उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं विहीरी आणि बोअरवेलची पाणी पातळी देखील खाली गेलीय. तर काही ठिकाणी विहीरी आटल्या आहेत तर बोअरवेल बंद पडले आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. पाणी नसल्यामुळं जनावरांसह त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. जनावरे कशी जगवावीत असा सवाल शेतकरी करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या: