Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज परभणीत (Parbhani Muk Morcha) सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे, नरेंद्र पाटील, बजरंग सोनवणे, ज्योती मेटे सहभागी झाले. यावेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी जोरदार भाषण केले.  


आमच्या जिल्ह्यातील जवळचा मुलगा गेलाय. त्यांच्यासाठी तुम्ही जमलात, त्यासाठी सर्व परभणीकरांचे आभार मानतो.  ज्यावेळेस मी ही घटना समजून घेतली.  जेव्हा फोटो मला गावकऱ्यांनी दाखवले. तेव्हा माझे टाळके सटकले.  हा कुठलाही एका जातीचा विषय नाहीय.  सर्व पक्षाचे नेते इथे आहेत. सर्वजण न्याय द्या म्हणतात...आरोपी पुण्यात होते. 28 तारखेपर्यंत एका मोठ्या रुग्णालयात इलाज करत होते. ज्यादिवशी आपल्यासारखे लोक रस्त्यावर आलो तेव्हा हे फरार झाले. त्या रुग्णालयामध्ये कोण कोण भेटले ते सीसीटीव्हीतून बाहेर काढा?, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. 


परळी स्टाईलने एकच ठिकाणाहून पकडले- संदीप क्षीरसागर


माझ्या जे काही लक्षात आले आहे...हे सर्व फिल्म स्टाईलने, परळी स्टाईलने एकच ठिकाणाहून पकडले. मास्टर माइंड वाल्मिक कराड हा पुण्यात होता. दवाखान्यात बसून हे सर्व टीव्हीवर पाहत होता. अवैध धंदे बंद झाले. मात्र वाल्मिक कराडचा जेव्हा विषय येते. तेव्हा कुठेतरी विषय थांबवला जातो. वाल्मिक कराडच्या पाठीमागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. सदर प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा, धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन हटवा आणि जे सीडीआरमध्ये सापडतील, त्यांना फाशी द्या...अशी आमची मागणी आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी केली. 


नरेंद्र पाटील काय म्हणाले?


आज बीडनंतर प्रत्येक जिल्ह्यात लोकांचे नेतृत्व करणार...आमचा मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. एकच मागणी आहे, आकाला उचला... त्याचा राजीनामा घ्या. या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड हा धनंजय मुंडे आहे, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितले. दरवेळेला लोक आमची भूमिका व्यक्त केली की संशय घेत होते. मात्र बीडमध्ये मी जी भूमिका मांडली त्यांनतर सर्वांना कळले, मी जातिवंत मराठा आहे. आम्ही आमच्या माणसाला न्याय देवू शकत नाहीत तर मग उपयोग काय?, माझी मराठा बांधवांना आणि बारा बलुतेदारांना आवाहन आहे, प्रत्येक जिल्ह्यात असा वाल्या निर्माण झालाय. अशा वाल्यांना सरकारने ठेचून मारले पाहिजे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली. 




संबंधित बातमी:


सरपंच हत्या प्रकरण: #3333 च्या मागे नेमकं काय लपलंय?; सुदर्शन घुलेच्या भावाच्या पोस्टची चर्चा