Vasai-Virar Municipal Corporation News : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. भाजपसह काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा सुरू करत निवडणुकीच्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः भाजप आणि काँग्रेस यांचा भर शहरातील कोणत्या प्रभागातून कोण निवडून येऊ शकतो, याचा आढावा घेऊन त्यानुसार रणनीती ठरवण्यावर आहे.
महानगरपालिकेची स्थापना आणि इतिहास
वसई-विरार महानगरपालिका ही महाराष्ट्रमधील एक मोठी महापालिका आहे. जी मुंबई उपनगरांपासून सुमारे 50 किमी उत्तरेला वसई खाडीच्या काठावर स्थित आहे. हे शहर भौगोलिकदृष्ट्या वसई, विरार, नालासोपारा, नायगाव आणि आसपासच्या गावांचा समावेश करतो. वसई-विरार महानगरपालिकेची स्थानपा अधिकृतरित्या 3 जुलै 2009 रोजी राज्य सरकारने स्थापन केली; त्यानंतर 1 जुलै 2010 रोजी औपचारिकपणे पालिकाअस्तित्वात आली. 2010 मध्ये निवडणुकीद्वारे निवडून येणारी महापालिका म्हणून कार्यप्रारंभ झाला. याआधी वसई, नालासोपारा, विरार आणि काहीगावांमध्ये स्वतंत्र नगरपालिका व ग्रामपंचायती चालत होत्या; त्यांची विलिनीकरण करून महानगरपालिकेचे स्वरूप तयार करण्यात आले.
या भागाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 12.22 लाख होती आणि आज अंदाजे 23 लाखांहून अधिक लोक येथे राहतात. वसई-विरार महानगरपालिका 311 चौ. कि.मी. क्षेत्र व्यापते आणि मुंबई मेट्रोपोलिटन भागाचा, महत्वाचा भाग हा आहे.
2) नगरसेवकांची संख्या व प्रभाग रचना
वसई‑विरार महानगरपालिका मध्ये नगरसेवकांची मुदत 28 जून 2020 रोजी संपली होती. त्यानंतर निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्या गेल्या आणि त्यामुळे निवडलेली नगरसेवक न बसता प्रशासक शासन लागू राहिलं होतं
सध्या वसई विरार महापालिकेत 29 प्रभाग असून, 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचीत जमाती (एस.टी.) साठी प्रत्येकी साठी 5 आरक्षण आहेत. तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत
3) मागील निवडणुकांचे निकाल आणि सध्याची राजकीय परिस्थिती
या क्षेत्रातील प्रमुख पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी (BVA) हा आहे. हा पक्ष अनेक वर्षे महापालिकेत बळकट आहे. 2015 च्या निवडणुकीत BVA ने महानगरपालिकेत मोठी बाजी मारली होती. 115 मध्ये 106 जागा जिंकल्या होत्या. परंतु सध्याच्या घडामोडी नुसार भाजपाचा प्रभाव वाढताना दिसतो आहे., विधानसभा 2024 मध्ये भाजपाचे वसई आणि नालासोपारा विधानसभेचे उमेदवार आणि बोईसर विधानसभा शिवसेने उमेदवारअसे तीन आमदार निवडून आले आहेत. बहुजन विकास आघाडीची 35 वर्षाच्या एक हाती सत्तेला भाजपा शिवसेनेने हादरा दिला आहे.
वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 2015 — पक्षनिहाय निकाल
पक्ष / आघाडी
मिळालेल्या जागा
एकूण जागा (115) पैकी
बहुजन विकास आघाडी (BVA) - 106 जागा
(115 पैकी 106)
भारतीय जनता पक्ष (BJP) - 1 जागा
काँग्रेस (INC) - 0 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) - 0 जागा
शिवसेना - 5 जागा
इतर / अपक्ष - 3 जागा
5) सध्याचं राजकारण – 2025 च्या निवडणुकींचा पार्श्वभूमी
वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूकांचा रणधूमाळ सुरु झाला आहे. ऐकीकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, तसेच कॉंग्रेस आणि मनसेच्या पदाधिकारी नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूरांच्या भेटी घेतल्या आहेत. युतीबाबत आणि जागांबाबत बोलणी सुरु आहे. माञ अद्याप ठोस भूमिका ठाकूरांनी घेतलेली नाही. तर येथे शिवसेना शिंदे गट आणि भाजपात युती झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीबाबत घोषणा केली आहे. तर आता जागा बाबत दोन्ही पक्षात बोलणी सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत वसई विरार मध्ये बघायला मिळेल. त्याच बरोबर महाविकास आघाडीला मनसेचा ही पाठबळ मिळणार आहे. मात्र विधानसभेतील पराभव, आणि सध्या नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव यामुळे सध्या महायुतीच पारडं जड आहे. माञ दोन्ही गट सध्याच्या महापालिका निवडणुकीसाठी सक्रिय मोर्चेबांधणी करत आहे आणि स्थानिक राजकारणात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
६) महत्वाचे मुद्दे आणि चर्चा
1) पायाभूत सुविधा (Infrastructure)
रस्ते आणि वाहतूक
अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्डे, पावसाळ्यात पाणी साचणेवसई-विरार पश्चिम-पूर्व जोडरस्त्यांचा अभावमुंबईकडे जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर कायमची कोंडीहे सर्वसामान्य नागरिकांचा सर्वात मोठा आणि कायमचा मुद्दा आहे.
2) लोकल रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक
लोकल गाड्यांमधील प्रचंड गर्दीविरार-चर्चगेट लोकलचा ताणमेट्रो (लाईन-9) व लोकल विस्तार प्रकल्पांचा संथ वेगबस सेवा (VVMT) अपुरी, वेळापत्रक विस्कळीत“घर ते काम” हा प्रवासच संघर्षमय अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
3) पाणी टंचाई आणि जलव्यवस्थापन
अनेक भागांत अजूनही आठवड्यातून 2-3 दिवस पाणीपुरवठाअनियमित वेळापत्रक, कमी दाबनवीन बांधकामांना पाणीपुरवठ्याचा प्रश्नटँकर माफिया चा वाढता प्रभाववाढती लोकसंख्या आणि अपुरी जलसाठवण ही गंभीर समस्या.
4) कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता
कचरा डेपो आणि प्रक्रिया प्रकल्पांवर नागरिकांचा विरोधगोखिवरे येथील ओपन डंपिंग असल्याने तेथे दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न जटील बनत चाललेतस्वच्छ भारत अभियान असूनही स्थानिक पातळीवर अंमलबजावणी कमजोर.
5) आरोग्य सुविधा
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपुरी सुविधामहापालिकेचं मोठ रुग्णालय अजून नाही. डॉक्टरांची कमतरता, उपकरणांचा अभावखासगी रुग्णालयांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
6) शिक्षण आणि नागरी सुविधा
महापालिकेच्या शाळां नाहीत.वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी शाळा-महाविद्यालये आहेत.मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा फोफावल्यातक्रीडांगण, उद्याने, ग्रंथालयांचा अभाव नव्या पिढीसाठी सुविधा अपुऱ्या असल्याची तक्रार.
7) अनियंत्रित शहरीकरण आणि बांधकाम
झपाट्याने वाढणारी लोकसंख्याभरमसाठ वाढणारी अनधिकृत बांधकामेड्रेनेज, पाणी, पार्किंगवर ताणअनधिकृत बांधकामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. खारफुटी, नाले, मोकळी जागा चाळ माफियांनी कब्जा करुन, मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्ती वसवल्या आहेत.
8) रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था
स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कमी आहेबहुतांश नागरिक मुंबईवर अवलंबून आहेतलघुउद्योग, MSME, पर्यटन संधींचा अपुरा वापर येथे होतं आहे. वसई विरारला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. पर्यटन विकास मोठ्या प्रमाणावर होवू शकतो. माञ कुणाचही लक्ष नाही.
9) भ्रष्टाचार आणि प्रशासन
माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याविरोधात ED कारवाईने महापालिकेच्या प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला उजेड दिला आहे, ज्याचा राजकीय आणि प्रशासकीय परिणाम स्थानिक भावना वाढवू शकतो. तसेच महापालिकेतील कामांमध्ये होणारा भ्रष्टाचाराचे आरोप. विकास कामाची गुणवत्ता खालच्या दर्जाची होत आहे. त्यामुळे अवघ्या तीन ते चार महिन्यात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते.
10) कायदा-सुव्यवस्था व सुरक्षितता
वाढती गुन्हेगारीमहिला सुरक्षेचा प्रश्नझोपडपट्टी व दाट लोकवस्तीतील पोलीस यंत्रणेवर ताणड्रग्सचा व्यापक झालं
11) पर्यावरण आणि जीवनमान
खारफुटी नष्ट होणेनाल्यांचे प्रदूषणपूरस्थिती (पावसाळ्यात)मोकळ्या जागांचा अभावशाश्वत विकास हा मुद्दा हळूहळू महत्त्वाचा ठरत आहे.