पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आलेल्या युवकास फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला. त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाने त्या युवकाला हिंदीतून बोलण्यास सांगितलं. तसेच आपल्याला मराठी (Marathi Language) 03:34 PM 22-10-2025ujयेत नाही असं म्हणत माजही दाखवण्याचा प्रयत्न त्या सुरक्षा रक्षकाने केला. त्यानंतर शिवरायांच्या वेशभुषेत आलेल्या त्या युवकाने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चांगलेच फैलावर घेतलं.
Vasai Fort Viral Video : नेमकं काय घडलं?
ही घटना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, वसई किल्ल्यावर झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान घडली. 'किल्ले वसई मोहीम परिवार' आणि 'अनाम प्रेम महाराष्ट्र' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेकडो दिवे प्रज्वलित करून ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक तरुणांनी शिवकालीन पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला होता.
त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात आलेल्या एका युवकाला तिथल्या सुरक्षा रक्षकाने हटकले. तसेच हिंदीतून बोला, मला मराठी येत नाही असा माज दाखवला. त्यानंतर शिवरायांच्या वेशात आलेल्या त्या युवकाने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा माज उतरवला.
सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये संबंधित युवक स्पष्ट शब्दांत म्हणताना दिसतो, "मराठी येत नाही का तुला? मराठी आलीच पाहिजे, मराठी येत नाही म्हणायचा आणि माज दाखवायचा हे चालणार नाही" अशा शब्दात त्या युवकाने हिंदी सुरक्षा रक्षकाला झापलं.
छत्रपतींच्या वेशात आल्यावर फोटो काढण्यास मज्जाव का करता? महाराजांच्या गड-किल्ल्यांवर अशी मनाई आम्ही खपवून घेणार नाही अशा शब्दात त्या युवकाने हिंदी सुरक्षा रक्षकाला सुनावले.
सोशल मीडियावर युवकाच्या ठाम भूमिकेचे कौतुक होत असून, 'छत्रपतींच्या गडावर त्यांच्या वेशातील युवकाला रोखणे ही दु:खद बाब आहे' अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.
गड-किल्ल्यांवर छत्रपतींच्या वेशातील युवकांना रोखले जाणे कितपत योग्य? सुरक्षारक्षकांकडून स्थानिक भाषेचा अपमान होतोय का? महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान राखला जातो का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.
ही बातमी वाचा: