Palghar Speaking Crow :  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेवटे व अतिदुर्गम भागातील गाव म्हणून गारगाव अशी या गावाची ओळख आहे. पण सध्या हे गाव एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलं आहे. या गावात चक्क एक बोलणार कावळा आढळून आला आहे.  एका आदिवासी कुटुंबाने हा कावळ्याचे संगोपन करत त्याला घरी पाळला आहे, जो अगदी माणसाप्रमाणे बोलतो.  लहानपणापासून हा कावळा याच कुटुंबासोबत राहतात असल्याने तो चक्क माणसा सारखा बोलायला शिकला आहे. सध्या या कावळ्याची सर्वत्र एकच चर्चा रंगत असून सोशल मीडियावरही त्याचे व्हिडिओ तूफान प्रसारित होत आहे.  

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव येथील मंगळ्या मुखणे यांच्या घरी तिन वर्षापुर्वी त्यांच्या मुलांनी एक कावळ्याचे लहान पिलू आणले होते. हा कावळा लहानाचा मोठा यांच्याकडे झाला. यावेळी त्यांनी त्याचे अगदी प्रेमाने संगोपन केलं. शिवाय लहानपणा पासून त्यासोबत संवाद साधला. कालांतराने तो काही शब्द उच्चारूलागला. यामुळे तो पुढे माणसा प्रमाणे बोलणे, माणसा प्रमाणे राहाणे या गोष्टी शिकला असून सध्या हा कावळा चक्क माणसा सारखा बोलत आहे. या कावळ्याची सर्वत्र सध्या चर्चा असून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेवटे व अतिदुर्गम भागातील गाव म्हणून गारगाव  या मुळे नव्याने चर्चेत आले आहे. 

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; भंडाऱ्याच्या खैरीपट गावातील घटना

रब्बी आणि उन्हाळी पिकांना पाणी देण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला करून त्यांना ठार केलं. ही घटना आज सकाळी भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट शेतशिवारात उघडकीस आली. डाकराम देशमुख (४०) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नावं आहे. डाकराम यांच्या शेतात मका पिकासह उन्हाळी भात पिकाचीही लागवड करण्यात आली आहे.

या पिकांना पाणी देण्याकरिता ते काल सायंकाळी शेतात गेले होते. मात्र, रात्र होऊनही ते घरी परत नं आल्यानं कुटुंबीयांनी वन विभागाच्या पथकासह त्यांचा शोध घेतला असता आज सकाळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केल्यानं छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्यांचा मृतदेह त्यांच्याचं मका पिकाच्या शेतात आढळून आला. मागील १५ दिवसांपासून या परिसरामध्ये पट्टेदार वाघाचं अस्तित्व आढळून येत असून त्याचा बंदोबस्त लावण्याकरिता वन विभागाचं पथक दिवस - रात्र गस्तीवर असताना ही घटना घडल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळतोय.

हे ही वाचा