पालघर : राज्यात सध्या नेतेमंडळींच्या कॅशबॉम्बवरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर आता मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलांसह एक व्हिडीओ शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी समोर आणला. गोगावलेंकडून एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न विचारत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. एकीकडे नेतेमंडळीच्या पैशांचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाचा आता एका पोलीस अधिकाऱ्याचा नोटांच्या बंडलासह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, एका जमीन व्यवहारात केवळ साक्षीदार म्हणून आपण उपस्थित राहिल्याची प्रतिक्रिया पोलीस (Police) निरीक्षकांनी दिली आहे. 

Continues below advertisement

शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या थैल्या आणि नोटांचे बंडल असलेल काही विडिओ सोशनल मीडियावर प्रसारित केल्याने आरोपांची राळ उठली होती. त्यानंतर, एकापाठोपाठ एक व्हिडिओ समोर येत असून तसाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंबई जवळच्या मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयातील पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांचा हा व्हिडिओ आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या मिटींगमध्ये नोटांच्या बंडलासमोर बसल्याचा, ते बंडल एका पिशवीत भरत असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एका जमिनीच्या आर्थिक व्यवहारावरुन आदिवासी बांधव बिल्डरला पैसे परत देत असल्याचा हा विडिओ असून, या व्यवहारात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांना याबाबत विचारल्यावर बिल्डर बंटी सिंग यांच्याविरोधात सुनील ढौला या आदिवासी बांधवाने जमिनीचे पैसे न दिल्याची तक्रार केली होती. प्रकरण आपल्याकडे आल्यावर, बिल्डर बंटी सिंगने त्या व्यवहारात ढौला यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येत असल्याने तक्रारी निवारण करुन देत नसल्याने आपण पुढील पैस न दिल्याचं म्हटलं होतं. मात्र, शेवटी बंटी सिंग याने आपण हा व्यवहार सोडत असून आपले 32 लाख रुपये पैस परत द्यावे, अशी तडजोड मान्य करण्यात आली होती. त्यावेळी वसईच्या एका बिल्डरच्या कार्यालयात ढौला हे 10 ते 12 लाख रुपये बंटी सिंगला परत देत असताना तेथे पुराव्यासाठी तो विडिओ काढला आहे. तसेच, पैसे देत असल्याचं दाखवण्यासाठी, आपणास तेथे बोलावण्यात आल्याची पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दिली. मात्र, कोणतीही तक्रार आल्यानंतर कायदेशीर कारवाई पोलिसांनी करने अभिप्रेत असते, तसेच पैशाच्या देवाण घेवाणीत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच काय काम? पैस द्यायचे असतील तेही पोलिसांसमोर तर मग पोलीस ठाण्यात का नाही दिले?. एका बिल्डरच्या कार्यालयातच का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 

Continues below advertisement

डीसीपींनी दिली माहिती, सखोल माहिती घेऊ 

वास्तविक पोलिसांच पैसे वसुली करणे किंवा साक्षीदार राहणे हे कामच नाही. तसेच, एवढी मोठी रक्कम रोख स्वरुपात होती, तेही पोलीस निरीक्षकाच्यासमोर ही बाब अचंबित करणारी आहे. त्यामुळे पोलिसांच्या एकूण भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, याबाबत डीसीपी सुहास बावचे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी ह्या जमिनीच्या व्यवहाराचे पैसे दोन पार्टी परस्पर संमतीने देत असल्याच सांगत, कुणाकडूनही पोलिसाविरोधात तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. कुणी कुणाला फसवून नये म्हणून, पोलिसांसमोर पैसे दिल्याचे बावचे यांनी सांगितले. तरीही या प्रकरणाची सखोल माहिती घेत असल्याचेही ते म्हणाले. 

हेही वाचा

मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल