Palghar News: कोरोना काळात (Coronavirus) डहाणू तालुक्यातील (Dahanu Taluka) गडचिंचले (Gadchinchale) येथे साधू हत्याकांड (Palghar Mob Lynching Case) घडला होता. त्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यात सर्वच भागांत जनसंवाद अभियान राबवलं जात आहे. याचा चांगला परिणाम म्हणून पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे गडचिंचले हत्याकांडाची (Palghar Mob Lynching) पुनरावृत्ती टळली आहे. जमावानं घेराव घातलेल्या दोन साधूंची पोलिसांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे गडचिंचले हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली.


पालघरच्या वाणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चंद्रनगर भागांत दोन साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते. मात्र हे साधू चोर असल्याच्या अफवेनंतर दोन्ही साधूंना परिसरातील काही नागरिकांनी घेराव घातला. ही बाब पोलीस प्रशासनाच्या लक्षात येताच तातडीनं वाणगाव पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमलेल्या जमावाची समजूत काढली.


पोलिसांनी या दोन्ही साधूंची घटनास्थळावरून सुखरूप सुटका केली. पालघर जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या गडचिंचलेमधल्या साधू हत्याकांडानंतर पोलिसांनी जनसंवाद अभियान सुरू केलं. या अभियानाअंतर्गत गावागावात जाऊन पालघर पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते. या अभियानामुळे नागरिकांनी तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीसही वेळेत घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.


काय होतं पालघरचं साधू हत्याकांड प्रकरण? 


पालघर जिल्ह्यात 16 एप्रिल 2020 रोजी गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावानं हल्ला केला. या हल्ल्यात दोन साधू आणि वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनलं आहे. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तसेच, या प्रकरणानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Palghar Accident : सायरस मिस्त्रींचा अपघात झालेल्या ठिकाणी पुन्हा अपघात; सीट बेल्ट लावल्याने तिघे बचावले