Palghar Long March: पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भव्य पायी मोर्चा काढला (Palghar Long March) आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉन्ग मार्चचा आज दुसरा दिवस आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील डहाणूच्या चारोटीहून या भव्य मोर्चाला सुरूवात झालीये, हा मोर्चा मासवण येथे मुक्कामी आहे. तर आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.

Continues below advertisement

पालघरमधील वाढवण प्रकल्प रद्द करावा, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करावी, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चात जवळपास 50 हजार नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. आम्हाला सरकारचे पंधराशे रुपये नको आमच्या मुलांना नोकऱ्या आणि रोजगार द्या,  मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमचा मोर्चा मुंबईकडे वळवू, रेल रोकोही करू असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. (Palghar Protest Long March)

...अन्यथा रेल रोकोही करू, आमदार विनोद निकोले यांचा इशारा (Palghar Protest Long March)

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉन्ग मार्च आत्ता पालघरकडे रवाना व्हायला सुरुवात झाली असून आज संध्याकाळपर्यंत हे लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही मंत्रालयाकडे आगेकूच करू अन्यथा रेल रोकोही करू, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. 

Continues below advertisement

संबंधित बातमी:

Vadhavan Port Palghar: वाढवण बंदरसह अदानींच्या स्मार्ट मीटरविरोधात एल्गार; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉन्ग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार