Palghar Local Train News Updates : पालघर : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) डहाणू-वानगाव स्थानकादरम्यान (Dahanu-Wangaon Station) ओव्हरहेड वायर (Overhead Wire) तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा (Mumbai Local Western Railway) खोळंबा झाला आहे. तसेच, याचा परिणाम उपनगरीय सेवांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या दुरुस्तीचं काम झालं असल्याची माहिती मिळत असून तरिदेखील गाड्या 40 ते 45 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान, डहाणूला (Dahanu) डाऊन लाईनच्या ओव्हरहेड वायर तुटल्यानं आज वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
डहाणूला डाउन लाईनच्या ओव्हरहेड वायर तुटल्यानं आज वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळपर्यंत लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. या लोकल केळवेरोड, पालघर, बोईसर किंवा वाणगाव येथून सोडण्यात येणार आहेत. बोईसर- दिवा ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे. सध्याही दुरुस्तीचं काम सुरु असून लोकल 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत आहेत तर याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही आहे. उमरोळी स्थानकात कुठलीही पॅसेंजर थांबत नसल्यानं, आज झालेल्या तांत्रिक बिघडामुळे उमरोळी स्थानकात वलसाड गाडीचा थांबा द्यावा, ही विनंती करण्यात आली होती, ती प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे.
सध्याही दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. लोकल 40 ते 45 मिनिटं उशिरानं धावत आहेत, तर याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही आहे. डहाणू रोड येथे ओव्हर हेड वायर ब्रेकडाउनमुळे आज खालील गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. पाहुयात कोणत्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत, ते सविस्तर...
- 22953 MMCT-ADI मुंबई सेंट्रल येथून 07:40 वाजता सुटेल
- 12009 MMCT-ADI मुंबई सेंट्रल येथून 07:20 वाजता सुटेल
- 22196 BDTS-VGLJ दादर येथून 06:30 वाजता निघेल
पश्चिम रेल्वेवर 204 लोकल फेऱ्या रद्द
पश्चिम रेल्वेनं खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या बांधकामांसाठी 29 दिवसांच्या सुरू असेल्या मेगाब्लॉकमुळे सोमवारपासून ते शुक्रवारपर्यत दिवसाला 316 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे पुरते हाल झाले आहे. तसेच, रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची कोंडी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने बुधवार रद्द करण्यात आलेल्या 316 लोकल फेऱ्यापैकी 112 ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai AC Local : मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर 10 एसी लोकल धावणार, नॉन एसी लोकलची संख्या कमी होणार