India vs Pakistan War नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना भारताकडून पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलली जात आहे. अशातच आता पाकिस्तानच्या दोन मोठ्या नेत्यांना भारतानं आणखीन एक झटका दिला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे ट्विटर खात भारतात बंद केल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे बिलावल भुट्टो झरदारीने कालच भारताबद्दल गरळ ओकली होती. परिणामी आता पकड्यांची देशात टीवटीव बंद करत भारताने आणखीन एक दणका दिला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पंतप्रधानचं खात दोन दिवसांपूर्वीच बंद केलं होतं. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक सुरूच ठेवल्याचे बोलले जात आहे.
बिलावल भुट्टो अन् इम्रान खानवर डिजिटल स्ट्राईक
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. त्यानंतर देशासह जगभरात संतापाची लाट पसरली होती. दरम्यान, अनेक कठोर निर्णय घेत भारताने चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच देशाच्या आयटी मंत्रालयाने एक्स कंपनीला भारतातील पाकिस्तानी सरकारचे खाते ब्लॉक करण्यास सांगितले होते. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानच्या अधिकृत X अकाउंट वर भारतात बंदी घातली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले सर्व राजनैतिक संबंध संपवणे भारतातील पाकिस्तानच्या फेसबुक आणि youtube चॅनलवर बंदी घालणे. असे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. जेणेकरून पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्यास भाग पाडता येईल. अशातच आता पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे ट्विटर खात भारतात बंद केले आहेत.
लष्कराची गोपनीय माहिती लीक? दोन हेरांना अटक
भारतीय लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली दोन हेरांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सोबत यांचे संबंध असल्याचं उघड झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अमृतसरमधील लष्करी छावणी परिसर आणि हवाई दलाच्या तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे लीक केल्याचा आरोप याच्यावर करण्यात आला आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहेत. सध्या अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून तपासात आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा