Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबाबत (Pahalgam Terror Attack) एक नवीन खुलासा झाला आहे. तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचे (Terrorist Farooq Ahmed) नाव समोर आले आहे. पहलगाम हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी ओव्हरग्राउंड कामगारांचे एक नेटवर्क तयार केले, ज्यांनी एफटी (FT) म्हणजेच हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केली. फारुख हा लष्कराचा एक टॉप कमांडर आहे आणि तो पीओकेमध्ये लपून बसला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Continues below advertisement

ओव्हरग्राउंड वर्कर नेटवर्कच्या माध्यमातून दोन वर्षांत अनेक दहशतवादी हल्ले

तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचे नावही समोर आले आहे. त्याने तयार केलेल्या ओव्हरग्राउंड कामगारांच्या नेटवर्कने पहलगाम दहशतवादी हल्ला घडवून आणण्यास मदत केली. फारुख हा लष्करचा एक टॉप कमांडर आहे आणि तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपून बसला आहे. गेल्या दोन वर्षांत, या दहशतवाद्याच्या ओव्हरग्राउंड वर्कर नेटवर्कने अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत आणि सर्वात प्रमुख म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ला असल्याचे बोललं जात आहे.

पाकिस्तान-भारतादरम्यान सतत फिरत होता, आता पाकिस्तानच्या आश्रयाला

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो पाकिस्तानच्या तीन सेक्टरमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करतो आणि त्याला खोऱ्यातील डोंगराळ मार्गांची चांगली माहिती आहे. कुपवाडा येथील या दहशतवाद्याचे घर काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी जमीनदोस्त केले होते.  

Continues below advertisement

अशातच दहशतवाद्यामध्ये टॉप कमांडर असलेल्या फारुख अहमद 1990 ते 2016 पर्यंत तो पाकिस्तान आणि भारतादरम्यान सतत फिरत होता. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याच्या अनेक साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो एका सुरक्षित अॅपद्वारे पाकिस्तानमधील त्याच्या नेटवर्क सदस्यांशी संपर्कात आहे. अशी देखील माहीती आता तपासात पुढे आली आहे. 

पाकिस्तानची झोप उडाली, मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद 

दरम्यान, दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्याने पाकिस्तानची झोप उडाल्याचे दिसून आले. नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याने मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरारने मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी येत्या 24-36 तासांत भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार असल्याची माहिती असल्याचा दावा अत्ताउल्लाहने केला आहे. 

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: आज गर्दी कमी, उद्या येऊया...दहशतवादी काय म्हणाला? जालन्यातील तरुणाने सांगितले; पहलगाममध्ये हल्ल्याच्या एक दिवसआधी काय घडलं?