Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 26 पर्यटकांची हत्या करणारे यमदूत म्हणजेच दहशतवादी अजूनही काश्मिरच्या जंगलात लपल्याचं समजतंय. सुरक्षा यंत्रणांकडून काश्मीरमध्ये हाशिम मुसाचा शोध सुरु आहे. 

दहशतवादी हाशिम मुसा त्याच्या साथीदारासह काश्मिरच्या जंगलात लपला असून, सुरक्षा यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे जंगलात रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडून इंटरनेटशिवाय वापरू शकतो अशा अॅल्पाईन क्वेस्ट मोबाईल अॅपचा वापर केला जातोय. तसंच दहशतवाद्यांकडे चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा आहे. 

हाशिम मुसा गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय-

हाशिम मुसा गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी असलेलं कनेक्शन उघड झालंय. पण त्याचं थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशीही काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जातोय. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधीही आला काश्मिरात होता. पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती होते. याबाबत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या ऐवजातून पुरावे आढळले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीचे पुरावे जगासमोर ठेवणार आहे. 

कारागृहातील कैद्यांची एनआयएकडून चौकशी-

पहलगाम हल्ल्याचा तपास आता जम्मूपर्यंत येऊन पोहचलाय. तिथल्या कारागृहातील कैद्यांची एनआयए कसून चौकशी करतंय. कारण 1 जानेवारी 2023 मध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या करण्यात आली होती. त्याच पद्धतीने पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करण्यात आलीय. त्यामुळे या कैद्यांचा पहलगाममधील दहशतवाद्यांशी संबंध आहे का याचा एनआयए तपास करतंय.

कोण आहे हाशिम मुसा?

- हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी उर्फ सुलेमान हा पाकिस्तानी नागरिक

- हाशिम मुसा पाकिस्तानचा माजी एसएसजी कमांडर

- सेवेत असतानाच लष्कर-ए-तय्यबामध्ये सहभागी

- एसएएसजी कमांडोंकडून पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमची उभारणी 

- या संघटनेकडून सैनिकांवर हल्ला करून पार्थिवाची विटंबना केल्याच्या घटना

- हाशिम मुसा एक ते दीड वर्षांपूर्वी पूंछ-राजौरी सेक्टरमधून भारतात दाखल

- 2023 मध्ये पूंछ-राजौरीमध्ये भारतीय सैनिकांवरच्या हल्ल्यात सहभाग

- पहलगाम हल्ल्यानंतर हाशिम मुसावर 20 लाखांचं इनाम

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार; पाकिस्तानचा थयथयाट, पुन्हा पोकळ धमकी