Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएला मोठे यश मिळाले आहे. एजन्सीने पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्यांना आश्रय देण्यात सहभागी असलेल्या दोन लोकांना अटक केली आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या असून या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 16 जण गंभीर जखमी झाले होते. अशातच या प्रकरणाचा तपास होत  असताना दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, अटक केलेल्यांची नावे परवेझ अहमद जोथर (बाटकोट, पहलगाम) आणि बशीर अहमद जोथर (हिल पार्क, पहलगाम) अशी आहेत.

Continues below advertisement

एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे की हल्ल्यापूर्वी दोघांनीही तीन सशस्त्र दहशतवाद्यांना त्यांच्या परिसरातील एका तात्पुरत्या झोपडीत (ढोक) आश्रय देऊन अन्न आणि आवश्यक वस्तू पुरवल्या होत्या. दहशतवादी हल्ल्यापूर्वी या दहशतवाद्यांना पूर्ण नियोजन करून आश्रय देण्यात आला होता. धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.

हल्लेखोर पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाचे सदस्य

पुढे आलेल्या माहितीनुसार, परवेझ आणि बशीर यांना बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (Unlawful Activities Prevention Act) 1967 च्या कलम 19 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या NIA केस RC-02/2025/NIA/JMU अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एनआयएने याबाबत पुष्टी केली आहे की, तिन्ही हल्लेखोर पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाचे सदस्य होते. सध्या या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

Continues below advertisement

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 6-7 मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर, पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि सीमेपलीकडून हल्ला केला, ज्यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानवर जलद हल्ले सुरू केले. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त झाले. त्याआधी भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द केला. त्यामुळे पाकिस्तान संतापला. त्याच वेळी भारत सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि त्यांना शेजारच्या देशात परत पाठवले.

हे ही वाचा