Retired Colonel Abhay Patwardhan: अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका इस्त्रायल विरुद्ध इराण या युद्धामध्ये थेटपणे उतरली किंवा अमेरिकेने टाकलेल्या महाकाय बॉम्बनंतर सुद्धा इराणचा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले. अभय पटवर्धन यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. अभय पटवर्धन यांनी सांगितले की इराण अण्वस्त्र निर्मितीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने अमेरिकेने तडकाफडकी इराणचे तीन आण्विक तळ उद्ध्वस्त केले. मात्र यामुळे इराणचा आण्विक अस्त्रे निर्मितीचा कार्यक्रम पूर्णपणे संपला असा म्हणता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर तो पंधरा-वीस वर्षे मागे पडला असे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की या परिस्थितीमध्येही फेस सेविंगसाठी युद्ध सुरूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केलं. मात्र, त्यांनी इस्त्रायलच्या आयर्न डोमच्या मिसाईलकडे लक्ष वेधले. आठ दिवस पुरतील इतका साठा शिल्लक आहे. या स्थितीत इसरायला हौथी, हमास यांच्यासोबत संघर्ष सुरूच ठेवावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी मध्ये पूर्वेत शांतता नांदेल असं दिसत नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या