Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील (Kashmir Terror Attack) पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) तपास करणाऱ्या एनआयएच्या हाती महत्वाचे पुरावे लागले आहेत. दहशतवादी हल्ल्याचे पुरावे आणि गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हा हल्ला हमासच्या शैलीत करण्यात आल्याची पुष्टी केली जात आहे. दरम्यान, एबीपी माझाच्या हाती एक नवीन व्हिडिओ मिळाला आहे. हा व्हिडिओ पहलगाम हल्ल्याच्या फक्त तीन दिवस आधी म्हणजेच 19 एप्रिलचा आहे आणि त्यात दिसत असलेले ठिकाण पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे. या दिवशी, दहशतवादी रउफ असगरने हमासचा दहशतवादी कमांडर आणि इराणमधील प्रतिनिधी खालिद कयुमी यांच्याशी जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयातील मस्जिद जामी सुभानल्लाह येथे बैठक घेतली. दहशतवाद्यांनी त्यांची हत्यारं बेताब खोऱ्यात लपवली होती.
तसेच पहलगाम हल्ला (Pahalgam Attack) लश्कर ए तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानचा कट होता असंही तपासात समोर आलं आहे. हमास आणि पाकिस्तान समर्थित संघटनांचा संपर्कात असून हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत हमास सामील झाला होता. तसेच पहलगाम हल्ल्यतील संशयितही पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत सहभागी होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान ही जिहादी हमास संघटना काय? हे जाणून घेऊया
काय आहे जिहादी हमास संघटना?
- पॅलेस्टिनची जिहादी दहशतवादी संघटना- इस्रायलविरोधात अनेक जिहादी अतिरेकी हल्ले, हिंसाचारात हमासचा समावेश- गाझापट्टीत इस्रायल विरोधात सतत संघर्ष - मुस्लिम ब्रदरहुडच्या इस्लामी विचारसरणीवर हमासची स्थापना- 1987 साली पासून वेगळी चूल - 2007 पासून गाझापट्टीवर हमासची सत्ता- हमासमध्ये इराण, सीरिया आणि लेबनॉनमधील शिया इस्लामी गट हिजबुल्ला अतिरेक्यांचा समावेश- हमासला शियापंथीय इराणचा पाठींबा - जगभरातील अनेक देशातील मुस्लिमांचं हमासला समर्थन- इस्रायल, अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपान अशा काही देशांमध्ये हमास दहशतवादी संघटना म्हणून घोषित. - 7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला करत 300 पेक्षा जास्त निष्पाप नागरिक मारले, हजारो जखमी तर शेकडोंचं अपहरण केलं- यानंतरच इस्रायलने युद्ध घोषित करुन गाझापट्टीचा विध्वंस केला- पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यावर हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याची छाप
हे ही वाचा