The Upcoming Projects Of OTT In 2023 : कोरोनानंतर या वर्षात अनेक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. या वर्षाप्रमाणे पुढील वर्षातदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. यात 'पाताल लोक 2' (Paatal Lok 2) ते 'द फॅमिली मॅन 3' (The Family Man Season 3) पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांचा सहभाग आहे. 


पाताल लोक 2 (Paatal Lok 2) : 


'पाताल लोक' (Paatal Lok) या वेबसीरिजच्या पहिला भागाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तेव्हापासून प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. आता पुढील वर्षात या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका पोलीसाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


अपहरण 3 (Apharan 3) : 


'अपहरण'चे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. दोन्ही सीझन सुपरहिट ठरल्यानंतर आता या वेबसीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या वेबसीरिजचा तिसरा भाग 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


ये काली काली आंखे (yeh Kaali Kaali Ankhein 2) : 


'ये काली काली आंखे' या बहुचर्चित वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता दुसरा सीझन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणर आहे. 


द फॅमिली मॅन 3 (The Family Man 3) : 


'द फॅमिली मॅन' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर प्रेक्षकांनी या सीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा केली. दुसरा सीझनदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2023 च्या सुरुवातीला प्राइम व्हिडीओवर ही वेबसीरिज प्रदर्शित होईल. 






संबंधित बातम्या


Shehnaaz Gill Saree Look : न्यू इयर पार्टीमध्ये स्टायलिश दिसायचंय? शहनाज गिलचे क्लासी लूक ट्राय करा