Sudarshan Chakra S-400 : भारताने पाकिस्तानवर सतत गोळीबार सुरू केला आहे. भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, जेव्हा भारतीय शहरांना पाकिस्तानने लक्ष्य केले, तेव्हा भारताने त्यांनाही यथोचित धडा शिकवला आहे. भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. हे काम भारताच्या सर्वात मजबूत हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने केले आहे. ही अशी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी हल्ला होताच सक्रिय होते आणि शत्रूचे विमान किंवा क्षेपणास्त्र त्वरित नष्ट करते. भारतीय सैन्याने या संरक्षण प्रणालीला सुदर्शन चक्र असे नाव दिले आहे, तर हे सुदर्शन चक्र शत्रूचा नेमकं कसा सफाया करते आणि त्यांची खास वैशिष्ट्य काय? या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Continues below advertisement


भारताचं सुदर्शन चक्र, S-400 क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य काय?


S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते.


ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे.


भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे.


ही मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते.


S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते.


ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.


S-400 मिसाईल सिस्टीमची ताकद:


S-400 ला जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम मानले जाते.


ही सिस्टीम रशियाने तयार केली आहे.


सुमारे 5 अब्ज डॉलर्सच्या करारानंतर 2018 मध्ये भारताने ही मिसाईल सिस्टीम खरेदी केली.


या करारात भारताने 5 युनिट S-400 मिसाईल सिस्टीम्स खरेदी केल्या.


S-400 ही मोबाईल लाँग-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे.


ही प्रणाली स्टेल्थ फाइटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV (ड्रोन) यांना लक्ष्य करू शकते.


यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात, ज्या 400 किमी अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात.


यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600  किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात.


एकावेळी 80 हवाई टार्गेट्स वर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते.


सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांत फायरिंगसाठी तयार होते.


यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ निष्फळ केला जाऊ शकतो.


पाकिस्तानकडून भारतीय लष्कराचे 'हे' 15  तळ लक्ष करण्याचा प्रयत्न  


अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज, या 15 ठिकाणी भारतीय लष्कराचे तळ लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला. आम्ही हाणून पाडला. डेब्रिज गोळा करण्याचे काम सुरू आहे. 



हे ही वाचा