Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भरतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान हा हल्ला होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतर ही कुठलीही कठोर कारवाई होत नसल्याने भरतीयांमध्ये अस्वस्थता ही दिवसागणिक वाढत होती. तर दुसरीकडे सीमेवर तनाव देखील अधिक तीव्र होत होता. अशातच तमाम भारतीयांची मानत घर करून राहिलेली चीड आणि या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदलानं घेतला आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर हल्ला केला आहे. बुधवारी(6 मे 2025) मध्यरात्रीच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत ही एअर स्ट्राईक सक्सेसफूल केलंय. दरम्यान ही 9 ठिकाणं नेमकी कोणती हे जाणून घेऊया.
पाकिस्तानमधील 'ती' 9 ठिकाणं कोणती?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केली आहे. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून अचूक हल्ला करण्यात आला आहे. या 9 ठिकाणांमध्ये बहवलपूर (2), मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक अमरू, सियालकोट या ठिकाणांचे समावेश आहे. या हवाई हल्ल्यात या ठिकाणी असलेले अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. ज्यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये सर्वाधिक विनाशाचे दृश्ये पाहायला मिळाली. त्यामुळे भारत फक्त इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश या हवाई हल्ल्यातून आता संपूर्ण जगाला गेला असल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं
दुसरीकडे पाकिस्तानी मीडियाच्या एक्सप्रेस ट्रिब्यूनने बहावलपूरच्या मुझफ्फराबाद, कोटली आणि अहमद पूर्व भागात हे हल्ले झाल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत हल्ल्याची पुष्टी केलीय. पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे की हवाई हल्ल्याची बातमी मिळताच त्यांच्या लढाऊ विमानांनी तात्काळ उड्डाण केले. तथापि, नुकसानीचा पूर्ण आढावा घेतला जात असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे मुझफ्फराबादमधील स्फोटानंतर संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
संबंधित बातमी: