नाशिक : गेल्या पंधरा दिवसापासून बंद असलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव अखेर उद्यापासून सुरू होणार आहेत. मात्र यापुढं कांद्याचे लिलाव खुल्या पद्धतीऐवजी गोणी पद्धतीनं होणार आहेत. मनमाडमध्ये नाशिक जिल्हा कांदा व्यापाऱ्यांच्या बैठक हा निर्णय घेण्यात आला.


 

येत्या सहा ऑगस्टपर्यंत गोणी पद्धतीन लिलाव सुरू राहणार असून त्यानंतर पुढचा घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून अडत घ्यावी यावर राज्यातील बाजार समित्यांत अडतदार आणि व्यापारी यांच्यात एकमत झालं आहे.

 

मात्र नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी मात्र अडत देण्यावरून अडून बसले होते. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा मार्केट बंद ठेवली होती. दरम्यान, गोणी खरेदीचा खर्च शेतकऱ्यांच्याच माथी येणार असून याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे.