गडचिरोली : मुलचेरा तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गट्टा येथे नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळले. ट्रकच्या ड्रायव्हरला नक्षलवाद्यांनी मारहाणही केली. या परिसरात सध्या नक्षलवाद्यांची दहशत निर्माण झाली आहे.


मुलचेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एटापल्ली रस्त्यावरील गट्टा या गावातील जंगलात एफडीसीएमचे काम सुरु आहे. दिवसभर काम झाल्यावर रात्री चारचाकी वाहन गट्टा गावात आणली जातात. याच वाहनांना काल रात्री नक्षलवाद्यांनी टार्गेट केले असून, मध्यरात्री दरम्यान मोठ्या संख्येने शस्त्रधारी नक्षलवादी गावाजवळ आले आणि गावात झोपून असलेल्या वाहन चालकांना उठवून मारहाण करत चारचाकी वाहन गावाबाहेर लावायला सांगितली.

चालकांना मारहाण केल्यनंतर नक्षलवाद्यांनी ट्रकची जाळपोळ केली.

गट्टा रस्त्यावर मोठमोठे बॅनर लावून कसनासुर बोरिया घटनेचा निषेध करत 10 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.