Nitin Gadkari नागपूर : सरकार विरोधात न्यायालयात याचिका टाकणारे काही लोक समाजात असायला हवे. त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते. कारण न्यायालयातील आदेशामुळे जे काम होऊ शकतात, ते सरकारमधील मंत्री ही करू शकत नाही. राजकारणी आणि मंत्र्यांना लोकप्रिय राजकारण (Popular Politics) आडवा येतो, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात (Nagpur) स्वर्गीय प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
कुशल संघटक म्हणून ज्या रवींद्र फडणवीस यांना पुरस्कार देण्यात आला, त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सरकारच्या अनेक चुकीच्या निर्णया विरोधात न्यायालयांमध्ये अनेक केसेस टाकल्या, न्यायालयीन लढा दिला. आणि अनेक वेळेला सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले, असा उल्लेख करत गडकरी यांनी न्यायालयात केस टाकणारे काही लोक समाजात असायला हवे, त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते, असे वक्तव्य केले आहे.
जेव्हा गडकरी हेमामालिनी यांना विनंती करतात!
सहा महिन्यात धापेवाडा टेक्सटाईलचे काम पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी येणार असून त्यांनी येताना धापेवाड्यात तयार झालेली साडी घालून येण्याची विनंती केल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. ते नागपुरात ऍग्रोव्हिजनच्या एका कार्यक्रमात बोलत होते. धापेवाडा टेक्स्टाईलमध्ये साडी तयार होत आहे. जी सिल्क साडी बाजारात 2 ते 3 हजारात मिळत आहे. तशीच साडी धापेवाडा टेक्सटाईल मध्ये अवघ्या 400 रुपयात तयार होणार आहे. जेणेकरून सर्व समान्य महिला सुध्दा त्या साड्या विकत घेऊ शकणार आहे. त्या साड्यांच प्रेझेंटेशन नुकतच मुंबईत करण्यात आलंय. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
धापेपाडा टेक्स्टाईलच्या सिल्क साडीसाठी मागणी इतकी वाढली आहे की आताच 200 साड्यांची वेटिंग लिस्टवर असल्याचे गडकरी म्हणाले. या साड्यांची जाहिरात व्हावी यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनाही बोलावले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांनी धापेवाड्यात तयार झालेली साडी घालूनच्या कार्यक्रमला यावे. जेणेकरून धापेवाडा टेक्स्टाईलच्या सिल्क साडीची प्रसिद्धी होईल, अशी विनंती हेमामालिनी यांना केली असल्याचं केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.
धापेवाडा टेक्स्टाईलच्या सिल्क साडी अगदी 400 रुपयात
नागपूर आणि विदर्भ हातमागसाठी प्रसिद्ध होते. आता पुन्हा इलेक्ट्रॉनिक हँडल्युमवर साडी तयार केली जात आहे. तेही अगदी 400 रुपयात विकली जाणार आहे. ज्या साड्यांची किंमत बाजारात दोन ते तीन हजाराची आहे. ती फक्त चारशे रुपये तयार होणार आहे. यासाठी महिलांना 60 रुपये मजुरी दिली जाणार, असेही गडकरी म्हणालेत.
हे ही वाचा