Nitin Gadkari : शिक्षकांचे ॲप्रूव्हल आणि अपॉइंटमेंट साठीही पैसे द्यावे लागतात हे मला माहीत आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मात्र त्याचा अर्थ असा नाही की शिक्षण संस्थानी "चलता है" म्हणत शॉर्टकट मारावे असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.

नागपुरात एका खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण अधिकारी शाळेत येतात, ते काय करतात, हे सर्वांना माहिती आहे. विशेष म्हणजे सध्या नागपूरसह विदर्भात बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा गाजत आहे. जरी गडकरींनी स्पष्टरित्या त्या घोटाळ्याचा उल्लेख केलं नसला, तरी त्यांचा टोला त्या संदर्भातच होता असे ही अनेकांना वाटतं आहे.  पुढे गडकरी यांनी त्यांच्या पत्नीच्या शिक्षण संस्थेचा उदाहरण ही दिलं. माझी पत्नी ही एका शिक्षण संस्थेची अध्यक्ष आहे. जेव्हा तिला त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करण्यात आले, तेव्हा मी शिक्षण संस्थेला शिक्षकांच्या अपॉइंटमेंट साठी पैसे घेऊ नये असे सांगितले. शिक्षण संस्था चांगली होण्यासाठी चांगले शिक्षक, चांगली इमारत, चांगले विद्यार्थी सर्व काही आवश्यक आहे. मात्र त्या शिक्षण संस्थेत शिकलेले विद्यार्थी भविष्यात कुठे जातात, ते स्वतःचा विश्व कसं निर्माण करतात, त्यावरूनच शिक्षण संस्थेची गुणवत्ता ठरते असेही गडकरी म्हणाले.

शॉर्टकट कुठेही मारु नका, जिथं जिथं तुम्ही शॉर्टकट माराल तिथं तुम्ही शॉर्ट व्हाल

शॉर्टकट कुठेही मारु नका, जिथं जिथं तुम्ही शॉर्टकट माराल तिथं तुम्ही शॉर्ट व्हाल असेही गडकरी म्हणाले. काही शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी रांगा आहेत. शिक्षकांबरोबर विद्यार्थीसुद्धा चांगले पाहिजेत असे गडकरी म्हणाले. शिक्षण क्षेत्रात सगळ्या प्रकारचे लोक आहेत असे गडकरी म्हणाले. 

शिक्षणाचे सार्वत्रिकरण होणं देखील गरजेचं

शिक्षणाचे सार्वत्रिकरण होणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षणाची गुणवत्ता देखील वाढली पाहिजे असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. अनेक समस्यांनी आपल्याला घेरलं असल्याचेही गडकरी म्हणाले.  तुमच्याकडील अडचणी आम्हाला सांगा असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपुरात एका खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण अधिकारी शाळेत येतात, ते काय करतात, हे सर्वांना माहिती आहे. विशेष म्हणजे सध्या नागपूरसह विदर्भात बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा गाजत आहे.

महत्वाच्या बातम्या:

रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल