Nita Mukesh Ambani Cultural Center : मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी यांच्या क्लचरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळा पार पडला. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' हे देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र आहे. या कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासली जाणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत. यात नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. 


'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन प्रसंगी दिग्गजांची मांदियाळी 


'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. सिनेजगतातील मंडळींसह, क्रीडा, संगीत, मॉडेलिंग आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच अनेक उद्योगपतीदेखील उपस्थित होते. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चा उद्धाटन सोहळा खूपच थाटामाटात पार पडला. अंबानी कुटुंबियांनी सर्व विविध क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळींचं स्वागत केलं.


धमकीप्रकरणानंतर सलमान खानची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. धमकी मिळाल्यानंतर सलमान खान कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला गेला नव्हता. तसेच तो त्याच्या सिनेमाचं प्रमोशनदेखील करत नव्हता. पण 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यानिमित्त सलमान खानने पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. दरम्यान त्याने शाहरुख खान, आर्यन खान, सुहाना आणि गौरी खानसोबत रेड कार्पेटवर फोटोदेखील काढले. 


दीपिका-रणवीर ते देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंची उपस्थिती


बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा या कार्यक्रमासाठी खास अमेरिकेहून आली होती. दीपिका-रणवीर, रजनीकांत, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, विद्या बालन, ऐश्वर्या राय, आमिर खान, जावेद अख्तर, शबाना आझमी, वरुण धवन आणि कृती सेननसह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, स्मृती इराणी हे राजकारणी मंडळींनीदेखील या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित होते. 


'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यालातील अंबानी कुटुंबियांचा लूक खूपच खास होता. मुकेश अंबानी, नीता अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंच यांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. उद्धाटन सोहळ्यादरम्यान नीता अंबानी म्हणाल्या,"नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' हे जगातील सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक केंद्रापैकी एक आहे. जगभरातील कलाकारांचं या कलाकेंद्रात स्वागत आहे.


संबंधित बातम्या


आकाशच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी मुकेश-नीता अंबानी सिद्धिविनायक चरणी