Nagpur News : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसंदर्भांत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकाराच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील नवी चक्रीय आरक्षण पद्धत लागू होणार आहे. राज्य सरकारने 20 आगस्टला हे परिपत्रक काढले आहे. या आधी 2002 मध्ये मतदारसंघासाठी आरक्षण चक्रीय पद्धत लागू करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये चक्रीय पद्धतीने आरक्षित सोडत काढली जात होती.

Continues below advertisement

मात्र गेल्या चार टर्ममध्ये मतदारसंघ निहायय आरक्षण चक्र पूर्ण झाले नसतांना, राज्य सरकारने नव्याने आरक्षण चक्रीय आरक्षण पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रत्येक जिल्हा परिषद मधील अनेक मतदारसंघाचे नागरिक आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणार आहे. नागपूर जिल्हा परिषदमध्ये 18 जिल्हापरिषद सर्कल असे आहे, जेथे मागच्या चार टर्ममध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाचे आरक्षणच लागू झाले नव्हते. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे.

हे. गडचिरोलीला विकासातील अग्रणी जिल्हा बनवू, मुख्यमंत्र्याच्या शुभेच्छा!

गडचिरोलीत बरेच काही करतो आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे. हा आमच्यासाठी राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. गडचिरोलीला विकासातील अग्रणी जिल्हा बनवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज 43 वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गडचिरोलीला माओवादापासून मुक्त करणे आणि तो उद्योग, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधायुक्त करणे, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले. आज अर्धा गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाला. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश माओवादमुक्त करण्याचा जो निर्धार केला आहे, त्यादिशेने आम्ही काम करतो आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलले; आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर नवीन पालकमंत्री

राज्य सरकारनं भंडाऱ्याचे पालकमंत्री बदललेत. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या ऐवजी आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडं जबाबदारी देण्यात आली आहे. संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सह पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संजय सावकारे यांना अचानक का बदलविले, आता अशी चर्चा भंडाऱ्यात सुरू झाली आहे.

संबंधित बातमी: