Maharashtra HSC Class 12 Results नागपूर : बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना आतुरता लागून राहिलेले महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे. आज (5 मे 2025)  अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यात राज्याचा निकाल 91.88 टक्के इतका लागला असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज्यात नेहमी प्रमाणे कोकण विभागाने आगेकूच करत सर्वाधिक 96.74 टक्के मिळवत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तर सर्वात तळाला लातूर विभागाने 89.46 टक्के मिळवले आहे.

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा (Maharashtra board result 2025) वेबसाईटवर हा निकाल आज सोमवार, 5 मे 2025 च्या दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक काहीशी वाढली आहे. आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या निकालात नेहमी प्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. तर एकूण 9 विभागात घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली आहे. अशातच नागपूर अमरावतीसह विदर्भ विभागाचा निकाल काय? हे जाणून घेऊ 

कोकण अव्वल स्थानी, तर लातूर तळाशी

कोकण – 96.74%

Continues below advertisement

कोल्हापूर – 93.64%

मुंबई – 92.93%

संभाजीनगर – 92.24%

अमरावती – 91.43%

पुणे – 91.32%

नाशिक – 91.31%

नागपूर – 90.52%

लातूर – 89.46%

बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी! निकालाचा टक्का 1.49 ने  घटला 

सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे म्हणजे मुलींची उत्तर नेत्यांची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्के ने जास्त आहेत. तर यंदा निकालाचा टक्का घसरला असल्याचे समोर आले आहे.  फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37% इतका होता. तर फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के इतका लागला आहे. त्यामुळे निकालाचा टक्का 1.49 ने यंदा कमी लागल्याची समोर आले आहे. 

बारावीचा शाखानिहाय निकाल 

शाखा निकाल
विज्ञान  97.35 टक्के
कला 8.52 टक्के
वाणिज्य  92.68 टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम 83.03 टक्के
आयटीआय 82.03 टक्के

निकाल कुठे पाहता येणार?

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) पाहाण्यासाठी खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील : (Where can I check HSC 12th result See A to Z information)

mahresult.nic.in

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org/

यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य काय?

- या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 आहे.

- खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36,133 एवढी असून त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,892  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 83. 73 आहे.

- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 42,388  पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42,024 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट अग्ले. त्यापैकी 15,823 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65 आहे.

- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी7, 258 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6, 705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 12.38 आहे.

-  बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI