Navi Mumbai Student ragging : नवी मुंबईतील (Navi Mumbai) कामोठे येथील एमजीएम डेंटल कॉलेजध्ये (MGM Dental Collage) चार विद्यार्थ्यांनी मिळून एका ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग (Ragging) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबधित चारही विद्यार्थ्यांवर ज्युनिअर विद्यार्थ्याची रॅगिंग (Student Ragging) केल्याप्रकरणी कामोठे पोलिसांकडून (Kamothe Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, चार जणांनी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला आधी दारू प्यायला लावली आणि नंतर स्वत:च्याच पँटमध्ये लघवी करण्याची जबरदस्ती केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान महाविद्यालयाने या चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले देखील केले आहे.
नेमकं काय घडलं?
संबधित घटना ही जुलै महिन्यामध्ये घडली होती, परंतु पीडित मुलाने आतापर्यंत याबाबत माहिती दिली नव्हती. अखेर आता त्याने आपल्यासोबत झालेल्या छळाची माहिती पालकांना दिली. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेला पीडित विद्यार्थी कामोठे येथे आपल्या 3 साथीदारांसह राहत होता. याच ठिकाणी दुसऱ्या फ्लॅटवर तिसऱ्या वर्षात शिकत असेलेले विद्यार्थी राहत होते. या चारही सीनियर विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थी आणि त्याच्या साथीदारांना त्यांच्या फ्लॅटवर येण्यास सांगत त्यांना दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडित तरुणाला लघवीला आली असता त्याला लघवी करण्यापासून रोखत त्याला अधिक पाणी पाजून लघवी रोखून धरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पॅन्टमध्ये लघवी करण्याचा आग्रह धरला.
चारही जणांवर गुन्हा दाखल
वरील संपूर्ण घटनेबद्दल पीडित विद्यार्थाने पालकांना कळवल्यानंतर कॉलेजपर्यंत ही गोष्ट पोहोचली. ज्यानंतर कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकाने ही तक्रार पोलिसांमध्ये केल्यानंतर कामोठे पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कामोठे पोलिसांनी चौघांविरुद्ध महाराष्ट्र छळ प्रतिबंधक कायदा 1999 (4) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हे देखील वाचा -