CM Eknath Shinde on Manoj Jarange नवी मुंबई : मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक करुन आपलं मनोगत व्यक्त केलं. मलाही गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


54 लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावं, कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावं आणि तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावं अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. त्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली. सर्व मागण्या मान्य करुन, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? 


मराठा समाजासाठी ज्याने संघर्ष केला ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो. फक्त राज्याचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष मराठा आंदोलनाकडे लागलं होतं. आपण  अतिशय संयतपणे, शिस्तीत आंदोलन केलं. कुठेही आंदोलनाला गालबोट न लावता यशस्वी केलं, त्याबद्दलही आपलं अभिनंदन करतो. आपल्या आंदोलनाचा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. 


दोन्ही गुरुंचा आशिर्वाद माझ्या पाठिशी


आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नुकतीच झाली. या दोन्ही गुरुंचा आशिर्वाद माझ्या पाठिशी आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या भूमीत आज हा ऐतिहासिक लढा यशस्वी झाला. त्यांनाही मी वंदन करतो. आमचं सरकार हे तुमचं सरकार आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले. 


मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं, मोठमोठी पदं अनेकांना मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे.


मुख्यमंत्रीही सर्वसामान्य माणूस आहे


कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मनोज जरांगे यांच्या पाठिशी सर्व मराठा समाज उभा राहिला. आज मुख्यमंत्रीही सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचा विचार करणारं आहे. 


सरकारने जे निर्णय घेतले त्यामध्ये, कुणबी प्रमाणपत्र देण्याचं शिंदे समितीला मुदतवाढ, प्रमाणपत्र देण्याचं शिबीर घेण्यासाठी अधिसूचना, नोंदी शोधण्यासाठी समिती, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर कायद्याच्या चौकटीत टिकणारं, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असं मराठा आरक्षण ज्या ओबीसींना सवलती मिळतात, त्या सवलती मराठ्यांना दिल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणतील. 


अण्णासाहेब पाटलांच्या कर्मभूमीत आंदोलन यशस्वी


 आजचा आंदोलनाकडे सर्व मराठा बांधवांच लक्ष लागलं होतं. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नाहीं. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. गोरगरीब लोकांच्या अडचणी कळत आहे. मी त्यामुळेच मराठा आरक्षण देईल अशी शपथ घेतली होती. आज आनंद दिघे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची देखील जयंती नुकतीच पार पडली. या दोघांचे आशीर्वाद मला आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभुमित आपला लढा यशस्वी होतं आहे. आमचं सरकार म्हणजे हे तुमचं सरकारं आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. अनेक मोठे नेते मराठा समाजात झाले. आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे गुलाल उधळण्याचा दिवस आहे. आम्ही सर्व मागण्या मान्य केल्या आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी इथ आलो. आज मनोज जरांगे यांनी सांगितलं की कुणबी नोंदी मराठवाड्यात सापडत नव्हती माञ आता लाखो कुणबी नोंदी सापडू लागल्या आहेत आपलं सरकारं घेणारे नाही तर देणारे आहे. मराठा समाज म्हणत होता की कुणाच्या ताटातील नको आमचं हक्काचं हवं आहे.


मुख्यमंत्र्यांचा विरोध संपला : मनोज जरांगे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना आपण विरोध होता.  समाज म्हणून आपला विषय संपला आहे. मी मुख्यमंत्री यांच्या हस्ते जूस स्वीकारणार आहे. आपण त्यांच्या हस्ते पत्र स्वीकारणार आहोत. समाजाला मी मायबाप मानले आहे. मी तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवू का? यावर सर्वांनी होकार दिल्याने मी निर्णय घेतला आहे.  सर्व खुट्या मी उपटल्या आहेत. मला विजयी सभा प्रचंड मोठी घ्यायची आहे. ती तारीख लवकर घोषित करणार, असल्याचे जरांगे म्हणाले. 



संबंधित बातम्या